अवघ्या 44 हजारात घरी न्या ‘या’ दमदार बाईक्स, तब्बल 90 किलोमीटरचं मायलेज देणार

बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो.

अवघ्या 44 हजारात घरी न्या 'या' दमदार बाईक्स, तब्बल 90 किलोमीटरचं मायलेज देणार
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 11:06 AM

मुंबई : बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सची माहिती देणार आहोत. (Buy Bajaj CT100 bike in just Rs 44000 and get mileage of 90km per litre know about 8 bikes of good capacity)

TVS Sport

या बाईकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्युल इंजेक्ट इंजिन मिळेल, ज्याची 8.29PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 4-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54,850 रुपये ईतकी आहे.

Bajaj कडक CT100

100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.

Hero Splendor Plus

कंपनीने ही बाईक नवीन स्टाईलमध्ये सादर केली आहे. यामध्ये तुम्हाला BS6 100cc चं सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. जे 8000 Rpm वर 7.91 Bhp पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जेनरेट करु शकतं. सोबतच या बाईकमध्ये 4-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 87 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. या बाईकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 59,750 रुपये इतकी आहे.

Bajaj Platina

या बाईकमध्ये कंपनीने 102cc चं BS6 कम्पलाइंट इंजिन दिलं आहे जे 8bph पॉवर आणि 8nm टॉर्क जनरेट करतं. हे 4-स्पीड ट्रांसमिशनने लेस असलेलं इंजिन एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देतं. या बाईकची किंमत 51,667 रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे.

Hero HF Deluxe

या बाईकमध्ये 97.2 cc चं सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एयर कूल्ड OHC इंजिन देण्यात आलं आहे. जे 8000rpm वर 7.91hp पॉवर आणि 6000rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करतं. हीरो एचएफ डिलक्स एक लीटर पेट्रोलमध्ये 83 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. या बाईकची किंमत (एक्स-शोरूम दिल्ली) 50,200 रुपये इतकी आहे.

Bajaj CT100

या बाईकमध्ये तुम्हाला 102cc चं 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे 7500 rpm वर 5.81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. सोबतच या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 89.5 किलोमीटपर्यंतच मायलेज देते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 44,122 रुपये इतकी आहे.

Honda Livo

या बाईकमध्ये तुम्हाला 109.51 cc चं एयर कूल्ड, 4 स्ट्रोक SI, BS-VI इंजिन दिलं आहे. या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटरचं मायलेज देते. Honda Livo ची एक्स शोरूम किंमत 70,059 रुपये इतकी आहे.

Hero Splendor iSmart 110

या बाईकची एक्स शोरुम किंमत 67,100 रुपये आहे. BS-VI इंजिन असलेली ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

हेही वाचा

TVS कडून शेजारील देशात Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच; जाणून घ्या खासियत

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच, केवळ 50 मिनिटात चार्ज होणार

(Buy Bajaj CT100 bike in just Rs 44000 and get mileage of 90km per litre know about 8 bikes of good capacity)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.