1 वर्षाची वॉरंटी, 89 KM मायलेजसह Bajaj ची बाईक अवघ्या 37 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

ही कंपनीची प्लॅटिना नंतरची सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. कमी वजन आणि अधिक मायलेज यामुळे ही बाईक खूप पसंत केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर तिची किंमत 52,832 ते 53,696 रुपये आहे.

1 वर्षाची वॉरंटी, 89 KM मायलेजसह Bajaj ची बाईक अवघ्या 37 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Bajaj Ct100
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 7:00 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. बजाज सीटी 100 (Bajaj CT100 ) असे या बाईकचे नाव आहे. (buy Bajaj Ct100 in just rs 37000, will get 1 year warranty too)

ही कंपनीची प्लॅटिना नंतरची सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. कमी वजन आणि अधिक मायलेज यामुळे ही बाईक खूप पसंत केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर तिची किंमत 52,832 ते 53,696 रुपये आहे. मात्र आम्ही ज्या डीलबद्दल सांगत आहोत, त्याच्या मदतीने तुम्ही ही बाईक फक्त 37 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. चला तर मग या बाईकबद्दल आणि डीलबाबत जाणून घेऊया.

बजाज सीटी 100 मध्ये कंपनीने 102 सीसी इंजिन दिले आहे, जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन 7.9 PS पॉवर आणि 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच यामध्ये 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये ती 89.5 किमी मायलेज देते. CARS24 ही वेबसाईट जी सेकंड हँड वाहने खरेदी करते आणि विकते, या कंपनीच्या साइटवर ही बजाज सीटी 100 सूचीबद्ध केली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचे मॉडेल 2018 चे आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक आतापर्यंत 54,275 किलोमीटर धावली आहे. बाईकची नोंदणी उत्तर प्रदेशच्या UP14 RTO ची आहे. आपल्याला या बाईकच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीसह मिळते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

PHOTO | वॅगन-आर ते किगर पर्यंत ‘या’ आहेत 5 सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार; या दिवाळीत करू शकता खरेदी

Nissan Magnite च्या ग्राहकांना धक्का, कंपनीकडून ग्लोबल प्रोडक्शनमध्ये 30 टक्के कपात, जाणून घ्या कारण

Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स

(buy Bajaj Ct100 in just rs 37000, will get 1 year warranty too)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.