शानदार ऑफर! अवघ्या 33 हजारात घरी न्या Bajaj Discover बाईक

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! अवघ्या 33 हजारात घरी न्या Bajaj Discover बाईक
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:53 PM

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Discover 100 bike in just 33000 rupees)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 33 हजारात Bajaj Discover 100Std बाईक

CredR वर तुम्हाला केवळ 33,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Discover 100 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 102cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक थर्ड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Chinchwad/Bajaj-Discover-100/19177) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक पुण्यात उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 23,822 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

कशी आहे Bajaj Discover 100?

Bajaj Discover 100 या बाईकची एक्स-शोरूम किंमत जवळपास 50 हजार रुपये इतकी आहे. ही बाईक कंपनीने 2015 मध्ये बंद केली होती. Bikedekho वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये 94.38cc चं इंजिन देण्यात आलं आहे. जे 7.7ps पॉवर आणि 7.85Nm टॉर्क जनरेट करतं. यासह या बाईकमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाईक 84 Kmpl इतकं मायलेज देते.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(Buy Bajaj Discover 100 bike in just 33000 rupees)

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.