अवघ्या 86 हजारात घरी न्या Royal Enfield Bullet 350, बाईक आवडली नाही तर पैसे परत

शानदार रॉयल एनफील्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता.

अवघ्या 86 हजारात घरी न्या Royal Enfield Bullet 350, बाईक आवडली नाही तर पैसे परत
Royal Enfield Bullet 350
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 2:13 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत.अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. रॉयल एनफील्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) असे या बाईकचे नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy Royal Enfield Bullet 350 in 86000 rupees, special offer with 12 months warranty)

बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकचं डिझाईन दमदार आहे. कंपनीने ही बाईक फक्त एका व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. तुम्हाला या बाईकमध्ये 346cc इंजिन मिळते, जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. इंजिन 19.36ps ची पॉवर आणि 28Nm चा पीक टॉर्क देते. यामध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. मायलेजबाबत कंपनी म्हणते की, यामध्ये तुम्हाला 40.8 किमीचे मायलेज मिळते.

ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला सेकंड हँड व्हेईकल सेलिंग वेबसाइट CARS24 वर जावे लागेल. कंपनीने बाईकची विक्री येथे सूचीबद्ध केली आहे. या बाईकची किंमत 86 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक 2016 च्या मॉडेलची आहे आणि ही फर्स्ट ओनर बाईक आहे. बाईकने आतापर्यंत एकूण 8,986 किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याच वेळी, त्याची नोंदणी HR 26 ची आहे. कंपनी येथे बाईकसोबत एक वर्षाची वॉरंटीही देत ​​आहे. याशिवाय, तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीदेखील दिली जात आहे.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(buy Royal Enfield Bullet 350 in 86000 rupees, special offer with 12 months warranty)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.