SUV market : ‘हॅचबॅक’ च्या किमतीत या पाच सर्वात ‘स्वस्त SUV कार’ करा, खरेदी.. 5.84 लाख पासून सुरू होणार किंमत !

कमी बजेट कॉम्पॅक्ट, मिनी, मध्यम आकाराच्या SUV कारना बाजारात जास्त मागणी आहे. जर तुम्ही स्वस्त SUV कार शोधत असाल तर आम्ही तुम्हाला येथे, 5-6 पर्याय सांगत आहोत ज्यामुळे तुमचा शोध पूर्ण होईल. जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त पाच एसयूव्ही कार.

SUV market : ‘हॅचबॅक’ च्या किमतीत या पाच सर्वात ‘स्वस्त SUV कार’ करा, खरेदी.. 5.84 लाख पासून सुरू होणार किंमत !
SUVImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 6:46 PM

देशातील ‘एसयूव्ही’ बाजारपेठ (SUV market) झपाट्याने वाढत आहे. हॅरियर, क्रेटा, सफारी, हेक्टर या वाहनांना ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आहे. या बाजाराकडे पाहता, कार कंपन्यांनी ‘कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ आणि ‘मिड-साईज एसयूव्ही’ सेगमेंटमध्येही अनेक मॉडेल लॉंच केले आहेत. या कमी बजेटच्या एसयूव्ही कारची मागणीही खूप आहे. जर, तुम्हीही कमी बजेटमध्ये स्वस्त SUV कार शोधत असाल तर आम्ही तुम्हाला ते पाच पर्याय सांगत आहोत ज्यामुळे तुमचा शोध पूर्ण होईल. जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त (The cheapest in the country)पाच एसयूव्ही कार. यामध्ये कीया, हुंडाई, टाटा पंच, रेनॉल्ट, टाटा निक्सॉन या गाड्यांचा समावेश आहे. सुमारे साडेपाच लाख किंमतीपासून या गाड्यांची किंमत सुरू होत असून, तुम्हाला परवडेल अशा किंमतीत, आकर्षक मॉडेल आणि स्टाईलमध्ये विविध एसयूव्ही कारचे पर्याय (Various SUV car options) येथे उपलब्ध आहेत.

  1. KIA Sonet: Sonet Kia च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये आघाडीवर आहे. कंपनीचे हे मॉडेल लोकांनी हातात घेतले आहे. सोनेट सर्वात स्वस्त SUV कारच्या यादीत येते. दिल्लीतील या कारची बेस मॉडेल किंमत 7.15 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
  2. Hyundai : Hyundai Venue ला कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये खूप मागणी आहे. उत्कृष्ट वैशिष्ट्यांमुळे आणि उत्कृष्ट लुकमुळे, ती ग्राहकांची लोकप्रिय निवड आहे. Venue E चे बेस मॉडेल दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 11.72 लाख रुपये आहे.
  3. Tata punch : टाटा पंच मिनी एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये, टाटाच्या पंचला ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. लॉन्च झाल्यापासून या कारचे जबरदस्त बुकिंग झाले आहे. टाटा पंचच्या बेस मॉडेलचा दिल्ली एक्स-शोरूम दर 5.68 लाख रुपयांपासून सुरू होतो तर टॉप मॉडेलचा दर 9.49 लाख रुपयांपर्यंत जातो.
  4. Renault kiger : रेनॉल्टची किगर ही 4 मीटर सब-एसयूव्ही सेगमेंटमधील एक शक्तिशाली कमी-बजेट कार आहे. पेट्रोल इंजिनमध्ये येणाऱ्या या कारमध्ये पाच जण प्रवास करू शकतात. सेफ्टी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर याला 4 स्टार मिळाले आहेत. 999 सीसी इंजिन असलेली ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीत या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे.
  5. Tata Nexon: टाटा कार तिच्या लुक, फीचर्स आणि बिल्ट क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या या कारला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. 1199 ते 1497 सीसी इंजिन असलेली ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. या कारच्या बेस मॉडेलची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे.

इतर बातम्या

Breaking News: जशास तसे, राणा दाम्पत्याची आता थेट मुख्यमंत्री आणि राऊतांविरोधात तक्रार, खार पोलीस ठाण्यात नोंद

Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय, बघू कोण अडवतोय?; नारायण राणेंचं शिवसेनेला आव्हान

Breaking News : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, आजची रात्र ठाण्यात जाणार? चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.