लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताय? स्पीड 40KM पेक्षा जास्त नको, क्रॅश हेल्मेट आवश्यक, जाणून घ्या नवे नियम

| Updated on: Oct 26, 2021 | 7:35 PM

मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 च्या संदर्भात आहे. या कलमात अशी तरतूद आहे की, केंद्र सरकार आपल्या नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेची तरतूद करू शकते.

लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताय? स्पीड 40KM पेक्षा जास्त नको, क्रॅश हेल्मेट आवश्यक, जाणून घ्या नवे नियम
Bike ride with pillion
Follow us on

नवी दिल्ली : मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 च्या संदर्भात आहे. या कलमात अशी तरतूद आहे की, केंद्र सरकार आपल्या नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेची तरतूद करू शकते. नवे नियम जे लोक मोटार सायकल चालवत आहेत किंवा लहान मुलांना मोटारसायकलवरुन घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी आहे. मुलांच्या सुरक्षेची तरतूद लक्षात घेऊन सरकारने काही नवीन नियम केले आहेत. हे आता मसुदा नियम असले तरी ते अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. (Can’t ride over 40kmph with kids below 4 on pillion: MoRTH ssued new safety guidelines for children)

रस्ते वाहतूक मंत्रालयाने आपल्या नियमांचा मसुदा तयार केला असून त्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. या मसुद्याला सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा नियम मोटारसायकलस्वारांसोबत बसणाऱ्या लहान मुलांबाबत आहे. मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, चार वर्षांखालील मुलांना मोटारसायकलस्वाराशी अटॅच करण्यासाठी सुरक्षा उपकरणे वापरली जातील. येथे हेल्मेट हे सुरक्षा साधन मानले जाऊ शकते.

काय आहे नियम?

शिफारशीत असे म्हटले आहे की, मोटरसायकलस्वाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याच्या मागे बसलेल्या 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांनी त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे. मुलाने असे मोटारसायकल हेल्मेट घातलेले असणे आवश्यक आहे ज्याला भारतीय मानक ब्युरो (BIS) ने मान्यता दिली आहे. म्हणजेच हेल्मेटचा दर्जा BIS च्या मार्गदर्शक तत्वांशी जुळला पाहिजे. तसे न केल्यास चालकावर कारवाई होऊ शकते.

क्रॅश हेल्मेट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट 2016 आणि युरोपियन (CEN) BS EN 1080 / BS EN 1078 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते असे म्हटले जाते. चार वर्षापर्यंतच्या मुलाला पिलियनच्या (ड्रायव्हरच्या मागे बसलेला प्रवासी किंवा डबल सीट प्रवासी) रूपात घेऊन जाणाऱ्या मोटारसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा.

हेल्मेट कसं असावं?

सेफ्टी हार्नेसबाबत, असे म्हटले आहे की, ते हेल्मेट बीआयएसच्या सर्व नियमांनुसार असावे. वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असायला हवे. ते वॉटरप्रूफ आणि टिकाऊ देखील असायलाच हवे. संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेली असावीत ज्यामध्ये मजबूत फोम असेल. सुरक्षा उपकरण इतकं मजबूत असावं की, 30 किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल. या मसुद्याच्या नियमाबाबत कोणाला काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ईमेलद्वारे कळवता येईल, असे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.

इतर बातम्या

PHOTO | वॅगन-आर ते किगर पर्यंत ‘या’ आहेत 5 सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार; या दिवाळीत करू शकता खरेदी

Nissan Magnite च्या ग्राहकांना धक्का, कंपनीकडून ग्लोबल प्रोडक्शनमध्ये 30 टक्के कपात, जाणून घ्या कारण

Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स

(Can’t ride over 40kmph with kids below 4 on pillion: MoRTH ssued new safety guidelines for children)