Auto News | काय सांगता? 1 किंवा 2 लाख नाही…. ‘या’ तीन कारवर मिळणार तब्बल 12 लाखापर्यंत डिस्काऊंट
Year End Discount Offer on Cars | वर्षाच्या अखेरीस तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. नव्या कारच्या खरेदीवर कंपन्यांकडून 11.85 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. SUV वर मोठा डिस्काऊंट आहे. कुठल्या कारच्या खरेदीवर इतका घसघशीत डिस्काऊंट मिळतोय? त्या बद्दल जाणून घ्या.
नवी दिल्ली : सगळ जग नव्या वर्षाची आतुरतेने वाट पाहतय. आणखी काही दिवसांनी वर्ष 2024 सुरु होईल. कार कंपन्यांसाठी हे उरले-सुरले दिवस खूप महत्त्वाचे आहेत. ऑटो कंपन्या आणि डीलरशिप ज्या मॉडल्सची विक्री झाली नाही, तो स्टॉक खाली करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ऑटो ब्रांड्सकडून मोठ्या डिस्काऊंट ऑफर्स मिळतात. नवीन कार विकत घेताना तुम्ही 11.85 लाख रुपयापर्यंत बचत करु शकता. तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक चांगली संधी आहे.
जवळपास प्रत्येक मोठी कार कंपनी डिस्काऊंट ऑफर्स देत आहे. मारुति सुजुकीपासून टाटा मोटर्स, हुंडई, महिंद्रा सारख्या टॉप ब्रांडच्या कार खरेदीवर तुमचे बरेच पैसे वाचतील. आम्ही तुम्हाला या बातमीत त्या तीन कारची माहिती देणार आहोत, ज्यावर लाखो रुपयांची सवलत मिळते. त्या तीन कारच्या डिटेल्स आणि ऑफर्स जाणून घ्या.
तीन SUV वर बंपर सूट
डिसेंबर 2023 मध्ये या तीन SUV वर तगडे डिस्काऊंट ऑफर्स आहेत.
Jeep Grand Cherokee SUV : जीपची फ्लॅगशिप एसयूवी ग्रँड चेरोकीवर सर्वाधिक डिस्काऊंट मिळतोय. जर, तुम्ही ही कार विकत घेतली, तर तुम्हाला 11.85 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. या SUV ची एक्स-शोरूम प्राइस 80,50,000 रुपये आहे. भारतात हे मॉडेल पेट्रोल इंजिनसह मिळतं. यात फक्त ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळेल.
Volkswagen Tiguan : फॉक्सवॅगनची शानदार SUV विकत घ्यायची असेल, तर मोठा डिस्काऊंट मिळेल. टॉप रेंज एसयूवी Tiguan वर 4.2 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सच्या माध्यमातून कंपनी ही सूट तुम्हाला देईल. त्याशिवाय 4 वर्षाच सर्विस पॅकेज आणि दुसरे बेनिफिट्स मिळतील. या कारची एक्स-शोरुम किंमत 35.16 लाख रुपयापासून सुरु होते.
Mahindra XUV400 EV : इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार असेल, तर महिंद्रा XUV400 चा विचार करु शकता. कंपनीची ही एकमेव इलेक्ट्रिक एसयूवी आहे, ज्याच्या खरेदीवर 4.2 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. ही सूट टॉप वेरएंट EL वर मिळेल. XUV400 ची एक्स शोरुम किंमत 15.99 लाख रुपयापासून सुरुवात होते.
(डिस्क्लेमर: डिस्काऊंट ऑफर्स लोकेशन आणि स्टॉकवर अवलंबून आहे. जास्त माहितीसाठी जवळच्या कार डीलरशिपशी संपर्क करा)