Car Insurance : कार इन्शोरंस घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही फसगत
कार इंश्योरंस घाईत खरेदी करण्याचा निर्णय तोट्याचा ठरू शकतो. कार इंश्योरंस खरेदी करण्याआधी काही बाबी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहेत.
मुंबई : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा असणे आवश्यक आहे, विम्याशिवाय कार, बाईक-स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन चालवल्यास मोठा दंड आकारला जातो. वाहन विम्याचे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये थर्ड पार्टी विमा आणि कॉम्प्रिहेंसिव विमा यांचा समावेश होतो. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये (Car Insurance) अपघात झाल्यास इतर व्यक्तीच्या वाहनाची आणि मालमत्तेची हानी झाल्यास भरपाई मिळते. दुसरीकडे, कॉम्प्रिहेंसिव विमा दोन्ही पक्षांचे नुकसान कव्हर करते. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, जे तुम्हाला मोटार व्हेईकल इन्शुरन्स घेण्यापूर्वी लक्षात ठेवावे. पॉलिसी घेण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
IDV व्हॅल्यू
सर्वप्रथम, जाणून घ्या की IDV चा अर्थ काय आहे? याचा अर्थ विमा घोषित केलेले मूल्य, हे मूल्य विमा कंपन्या तुम्हाला दाव्यादरम्यान देतात.
अॅड ऑन विमा
पॉलिसी घेण्यापूर्वी, तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की विमा कंपन्यांकडे ग्राहकांसाठी अनेक अॅड ऑन योजना देखील आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही अॅड ऑन पॉलिसी निवडू शकता. दिल्लीत आता ज्या प्रकारे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यादरम्यान ज्या लोकांच्या गाड्या किंवा इतर वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी आले आहे, त्यांना आता इंजिन दुरुस्तीसाठी हजारो ते लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत.
इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की ज्यांनी कार इन्शुरन्स पॉलिसीसह इंजिन प्रोटेक्टर सारखी अॅड योजना घेतली आहे त्यांचे लाखो रुपये वाचतील. अॅड-ऑन योजना स्वतंत्रपणे घेतल्यास प्रीमियममध्ये नक्कीच वाढ होते, परंतु इंजिनमध्ये पाणी शिरल्यास लाखो रुपयांचा फटका बसण्यापासून वाचू शकता.
पॉलिसी प्रीमियमची तुलना करा
एक गोष्ट जी तुम्ही पाहिजे ती म्हणजे विमा खरेदी करण्यापूर्वी विमा प्रीमियमची तुलना केली पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्लॅनच्या किमतींमध्ये तुम्हाला बराच फरक दिसतो.
क्लेम सेटलमेंट रेशो
विमा खरेदी करण्यापूर्वी, विमा प्रदाता कंपनीचा CSR म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. ज्यावरून विमा पुरवठादार कंपनीने गेल्या वर्षभरात किती दावे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत हे कळते. जर कंपनीचे प्रमाण योग्य असेल तर तुम्ही त्यातून विमा घेऊ शकता.