Car Insurance : गाडीची रनिंग कमी असेल, तर कमी पैशात इंश्योरेंस मिळू शकतो का? हो, कसं ते समजून घ्या

Motor Insurance Policy : तुम्हाला असं वाटतं का, तुमच्या Car Insurance चा प्रीमियम खूप जास्त आहे? हो, असं उत्तर असेल तर तुम्ही प्रीमियम कमी करु शकता. आश्चर्य वाटलं असेल, ना कसं? अशी एक शानदार इंश्योरेंस पॉलिसी आहे, जी प्रीमियम कमी करायला मदत करते. पण इंश्योरेंस पॉलिसी विकत घेण्याआधी फायदे आणि नुकसान समजून घ्या.

Car Insurance : गाडीची रनिंग कमी असेल, तर कमी पैशात इंश्योरेंस मिळू शकतो का? हो, कसं ते समजून घ्या
Car InsuranceImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 1:13 PM

कटारिया इंश्योरेंसचे मोटर हेड संतोष सहानी यांनी Pay as you Drive इंश्योरेंस पॉलिसीबद्दल सांगितलं. या इंश्योरेंस पॉलिसी अंतर्गत इंश्योरेंस कंपनी ग्राहकांना 2500, 5,000 आणि 7,000 किलोमीटरपर्यंतचे ऑप्शन्स ऑफर करते. जर, तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही वर्षभरात 2500 किलोमीटर पेक्षा जास्त गाडी चालवत नाहीय, तर तुम्ही Pay as you Drive इंश्योरेंस पॉलिसी विकत घेऊन इंश्योरेंस प्रीमियम कमी करु शकता. जर, तुम्हाला 5 किंवा 7 हजार किलोमीटरचा प्लान हवा असेल, तर तुम्ही हा प्लान विकत घेऊ शकता. एकूण मिळून या इंश्योरेंस पॉलिसीचा फायदा हा आहे की, तुम्ही तुमचा प्रीमियम तुमच्या गाडीच्या रनिंगच्या हिशोबाने कमी करु शकता.

प्रत्येक इंश्योरेंस कंपनीकडे अशा प्रकारची इंश्योरेंस पॉलिसी नाहीय. मार्केटमध्ये काही निवडक कंपन्या ग्राहकांना अशा प्रकारची पॉलिसी सुविधा ऑफर करतायत. संतोष सहानी यांनी सांगितलं की, “ICICI आणि Reliance सारख्या कंपन्यांकडे असे प्लान्स आहेत, जे तुम्ही विकत घेऊ शकता. ICICI कडे 5000 किलोमीटर आणि 7000 किलोमीटर दुसऱ्याबाजूला रिलायन्सकडे 2500 किलोमीटर आणि 5000 किलोमीटरचे प्लान्स उपलब्ध आहेत”

…तर, क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही

फायदा तुम्ही समजून घेतलात आता नुकसान समजून घ्या. प्रीमियम वाचतोय ही चांगली बाब आहे. पण 5000 किलोमीटरनंतर पॉलिसी एक्सपायर होईल. पॉलिसी विकत घेतल्यानंतर काही महिन्यानंतर तुम्हाला असं वाटलं की, कारची रनिंग 5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त होऊ शकते, तर 5 हजार किलोमीटर पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पॉलिसी रिन्यू करु शकता. तुम्ही पॉलिसी रिन्यू केली नाही आणि 5 हजार किलोमीटर रस्ते अपघातानंतर कार डॅमेज झाली, तर इंश्योरेंस कंपनीकडून तुम्हाला क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.