Car Loan : कारसाठी लोन हवं! कोणती बँक किती टक्क्यांनी देते कार लोन? किती असेल ईएमआय? जाणून घ्या
अॅक्सिस बँक चारचाकी वाहन कर्जावर 7.45 टक्के व्याज आकारत आहे. ही बँक चारचाकीचे स्वप्न साकारण्यासाठी तुमच्याकडून 3500 ते 7000 हजार रुपये प्रक्रिया शुल्क घेणार आहे. तर फेडरल बँकेच्या कार लोनसाठी 8.50 टक्के व्याजाने कर्ज रक्कम चुकती करावी लागणार आहे.
मुंबई : चारचाकी वाहनांसाठी (Four Wheeler) अद्याप व्याजदर (Car Loan)कमीच आहेत. वाहनांसाठी व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. अशा परिस्थितीत गाडी घ्यायची असेल तर काही बँकांचे व्याजदर तुम्ही तपासू (Car Loan Interest rate)शकता. कर्ज घेण्यापूर्वी व्याज दर पाहावेत आणि ज्या बँकेत तुम्हाला व्याजदराचा तुम्हाला फायदा मिळतो. प्रक्रिया शुल्क कमी लागते अशा बँकेतून कर्ज घ्यावे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सध्या 7 टक्के दराने कार लोन देत असून हे कर्ज 8 वर्षांकरीता असेल. सध्या कार लोन घेताना आणखी एक सुविधा झाली आहे ती म्हणजे तुम्हाला कारच्या ऑन रोड (On Road) किंमतीच्या 90 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यामुळे डाऊन पेमेंटसाठी फार मोठी रक्कम खिश्यात नसली तरी तुम्ही चारचाकीचे स्वप्न पूर्ण करु शकता.
7.30 टक्के दराने वाहन कर्ज
कमी दराने चारीचाकी वाहनांचे कर्ज देणाऱ्या काही बँकांच्या यादीवर नजर टाकूया. यात सर्वात अगोदर बँक ऑफ बडोदाचे नाव येते. या बँकेत चारचाकी वाहनांसाठी 7 टक्के व्याज मिळते. विशेष म्हणजे या वाहन कर्जासाठी तुम्हाला प्रक्रिया शुल्क अगदी नाममात्र मोजावे लागणार आहे. ही बँक प्रक्रिया शुल्कासाठी तुमच्याकडून 1500 रुपये घेते. यानंतर क्रमांक लागतो तो कॅनेरा बँकेचा. ही बँक 7.30 टक्के दराने वाहन कर्ज देत आहे. प्रक्रिया शुल्क म्हणून कर्जाच्या 0.25 टक्के अथवा कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यत चुकते करावे लागतील.
कोणत्या बँकेचा दर किती?
अॅक्सिस बँकेचे कार लोन घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 7000 रुपये प्रक्रिया शुल्क द्यावे लागेल. फेडरल बँकेच्या कार कर्जाचे दर 8.50 टक्के दराने सुरू होतात. या बँकेचे प्रक्रिया शुल्क जाणून घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया चारचाकी वाहन कर्जासाठी 7.20 टक्के दराने कर्ज पुरवठा करत आहे.
लक्झरी कार घेण्यासाठी कर्ज पुरवठा करणा-या बँकेत एचडीएफसी बँकेचा वरचा क्रमांक लागतो. या बँकेचा व्याजदर हा 7.95 टक्के इतका आहे. लक्झरी कार खरेदीसाठी एचडीएफसी बँकेकडून जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांचे कर्ज घेता येते. लक्झरी कारच्या काही मॉडेल्सवर ही बँक 100 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहायता करते. . स्टेट बँकेचे कार लोन शेती किंवा शेतीच्या कामासाठी योग्य आहे. त्याचा व्याजदर 7.20 टक्के असून, कर्जाचा कालावधी 84 महिन्यांचा आहे. एसबीआय एकूण वाहन कर्जाच्या 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय करते. शेतीच्या कामात झोकून दिलेल्या लोकांसाठी हे कर्ज वरदान आहे.
अॅक्सिस बँक कारसाठी अल्प कर्ज देते. त्याचा व्याजदर 7.45 टक्के असून कर्जाची मुदत 96 महिने आहे. कारची संपूर्ण ऑन-रोड किंमत कर्ज म्हणून दिली जाऊ शकते. 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. सेकंड हँड किंवा जुनी कार खरेदी करण्यासाठी कॅनरा बँकेकडून कर्ज घेऊ शकता. त्याचा दर 7.30 टक्के आहे. कर्जाचा कालावधी 84 महिन्यांचा असतो. गाडीच्या ऑन रोड किमतीच्या 90 टक्के रक्कम अर्थसाह्य केली जाते . या कर्जप्रकरणात महिलांना व्याजदरात अतिरिक्त सवलत मिळते.