दिवाळीनंतरही कार्सचं लाँचिंग सुरुच राहणार, मारुती, ऑडी, मर्सिडीजच्या गाड्या सज्ज
भारतात दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याआधी बहुतेक लोक आपल्या घरी नवीन कार आणण्याचा विचार करत आहेत. पण जर तुम्ही दिवाळीपूर्वी ही संधी गमावली तर त्यानंतरही बरेच चांगले पर्याय समोर येणार आहेत.
मुंबई : भारतात दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याआधी बहुतेक लोक आपल्या घरी नवीन कार आणण्याचा विचार करत आहेत. पण जर तुम्ही दिवाळीपूर्वी ही संधी गमावली तर त्यानंतरही बरेच चांगले पर्याय समोर येणार आहेत. वास्तविक, नोव्हेंबरमध्ये अनेक ब्रँड भारतात त्यांच्या कार आणणार आहेत, ज्यामध्ये मारुती, ऑडी आणि मर्सिडीज सारखे ब्रँड आहेत, जे नवीन कार आणण्याचा विचार करत आहेत. (Cars will continue to be launched after Diwali, Maruti, Audi, Mercedes cars are ready)
मर्सिडीज बेंझ AMG A45 S
मर्सिडीज-बेंझ 17 नोव्हेंबर रोजी AMG A45 S Matic भारतात लॉन्च करणार आहे. आगामी मर्सिडीज मॉडेल हे भारतात सादर होणारे जर्मन कार निर्मात्या कंपनीचे सर्वात लहान आणि वेगवान मॉडेल असेल. मर्सिडीजच्या आगामी मॉडेलमध्ये 2.0-लीटर, फोर-सिलेंडर, टर्बोचार्ज केलेले इंजिन असेल, जे 416bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करेल. याच्या जोडीला आठ-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन आहे, ही कार केवळ 3.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.
मारुती न्यू सेलेरियो
येत्या 10 नोव्हेंबरला मारुती भारतात एक नवीन कार आणणार आहे, या कारचे नाव मारुती सुझुकी सेलेरियो असे आहे. अधिकृत लॉन्चपूर्वी अनेकदा ही कार टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहे. आगामी मॉडेल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि आधीच्या मॉडेलपेक्षा मोठे असेल. हॅचबॅकमध्ये 1.0-लीटर इंजिन दिले जाऊ शकते जे 67bhp आणि 91Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यामध्ये दुसरे 1.2-लीटर इंजिन दिले जाऊ शकते, जे 82bhp आणि 113Nm टॉर्क निर्माण करेल.
ऑडी Q5 फेसलिफ्ट
ऑडीने नुकतेच Q5 फेसलिफ्टचे उत्पादन सुरू केले असून त्याची किंमत नोव्हेंबरमध्ये जाहीर केली जाईल. ऑडीच्या या SUV कारमध्ये ग्रिलवर व्हर्टिकल क्रोम स्ट्रिप, DRLs आणि LED हेडलाइट्स पुढील आणि मागील बंपरवर मिळतील. Q5 फेसलिफ्ट प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजीच्या दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाईल. यात चार-सिलेंडर 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 249bhp पॉवर आणि 370Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
स्कोडा स्लाव्हिया
Skoda ची आगामी कार नुकतीच टेस्टिंगदरम्यान पहायला मिळाली आणि ही कार 18 नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाईल. ही स्कोडा कार MQB AO IN प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या कारची किंमत स्कोडा रॅपिडपेक्षा जास्त असेल आणि कंपनीने स्कोडा रॅपिडचे उत्पादन आता थांबवणार असल्याचे जाहीर केले आहे. यात थ्री-सिलेंडर 1.0-लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 115bhp पॉवर जनरेट करेल.
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(Cars will continue to be launched after Diwali, Maruti, Audi, Mercedes cars are ready)