Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 मिनिटात चार्ज, सिंगल चार्जवर 130KM धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात

दुचाकी उत्पादक कंपनी सीएफमोटोने (CFMoto) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची सब-ब्रँड झीहो (Zeeho) लाँच केली होती.

30 मिनिटात चार्ज, सिंगल चार्जवर 130KM धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात
Zeeho Cyber Electric Scooter
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:16 AM

बीजिंग : चीनची आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सीएफमोटोने (CFMoto) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची सब-ब्रँड झीहो (Zeeho) लाँच केली होती, जी इलेक्ट्रिक दुचाकी तयार करते. यानंतर कंपनीने अलीकडेच त्यांची बाईक 300NK ची नवीन बीएस 6 आवृत्ती भारतीय बाजारात लाँच केली आहे. त्यानंतर आता कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. (CFMoto is going to launch Zeeho Cyber Electric Scooter in india, will give 130KM range in single charge)

CFMoto च्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची कॉन्सेप्ट नुकतीच सादर करण्यात आली होती. ZigWheels च्या अहवालानुसार कंपनी लवकरच झीहो सायबर इलेक्ट्रिक स्कूटरचे (Zeeho Cyber Electric Scooter) प्रॉडक्शन मॉडेल बाजारात आणणार आहे. KISKA Designs द्वारे ही स्कूटर डिझाईन करण्यात आली आहे.

Zeeho Cyber ई-स्कूटरचं डिझाईन

या स्कूटरच्या कॉन्सेप्ट डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास ते फ्युचरिस्टिक डिझाइनवर आधारित आहे, पण त्याचे प्रॉडक्शन मॉडेल त्यापेक्षा वेगळे असेल. कॉन्सेप्ट फॉडलमध्ये स्कुटरच्या फ्रंटला LED हेडलॅम्प देण्यात आले आहेत, जे टू-विंग लाइट पॅनेलसह सुसज्ज आहे. त्याचा पुढचा भाग मस्क्युलर आणि स्पोर्टी दिसतो, जो रियर एंडपेक्षा लहान आहे. या स्कूटरची सीट थोडी लहान आहे, परंतु दोन व्यक्तींना बासण्यासाठी पुरेशी आहे.

Zeeho Cyber ई-स्कूटरचे स्पेसिफिकेशन

या स्कूटरमध्ये 4kWh ची लिथियम आयन बॅटरी आहे आणि 10 किलोवॅट वॉटर-कूल्ड मोटर आहे जी 13.4 बीएचपी पॉवर आणि 213 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. वेगाच्या दृष्टीने हे बेस्ट आहे. ही स्कूटर केवळ 2.9 सेकंदात 0 ते 50 Kmph इतका वेग पकडू शकते. ही स्कूटर जास्तीत जास्त 110 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 130 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

यामध्ये तुम्हाला Eco, Street Sport असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्कूटरची बॅटरी 3 लाख किलोमीटरपर्यंत आहे. अवघ्या 30 मिनिटांत यामधील बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ही बॅटरी अशा प्रकारे तयार केली गेली आहे की -20 अंश ते 55 अंश तापमानातही ती उत्तम प्रकारे काम करते. जवळजवळ सर्वच देशांमधील हवामानानुसार ही बॅटरी उत्तमप्रकारे काम करते, तशाच पद्धतीने ही बॅटरी डिझाईन करण्यात आली आहे.

वर्षअखेरपर्यंत लाँच होणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतात सादर होणारं मॉडेल यापेक्षा थोडं वेगळं असेल आणि कंपनी लवकरच त्याबद्दल माहिती शेअर करेल. असं म्हटलं जातंय की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करू शकते. मात्र जागतिक बाजारात त्याआधीच (जूनमध्ये) लाँच केली जाईल.

इतर बातम्या

Mercedes-Benz ची लक्झरी E-Class चं नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Photos | Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

सिंगल चार्जवर 230 किमी रेंज, Renault Kwid Electric भारतात लाँच होणार?

(CFMoto is going to launch Zeeho Cyber Electric Scooter in india, will give 130KM range in single charge)

दिशा सालियन प्रकरणातील Exclusive बातमी, ...तेव्हा दिशाच्या अंगावर कपडे
दिशा सालियन प्रकरणातील Exclusive बातमी, ...तेव्हा दिशाच्या अंगावर कपडे.
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.