बॉस असावा तर असा ! कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त महागड्या गाड्यांची भेट

ऐकावं ते नवलच! असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर ही बातमी वाचून येऊ शकते. एका दानशूर मालकाने कर्मचाऱ्यांना कार, बाईक आणि स्कूटर भेट दिली आहे. या कंपनीचे नाव सारमाउंट लॉजिस्टिक्स असून मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी लॉजिस्टिकचा व्यवहार करते. नवीन वर्षाच्या आधी ही भेट देऊन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.

बॉस असावा तर असा ! कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त महागड्या गाड्यांची भेट
कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त महागड्या गाड्यांची भेट
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 3:10 PM

वाद घालणारे बॉस, पगारवाढ न देणाऱ्या कंपन्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला नववर्षानिमित्त महागड्या गाड्या भेट देणाऱ्या कंपनीविषयी माहिती देणार आहोत. ही कंपनी चेन्नई स्थित सरमाउंट लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आहे. या कंपनीने महागड्या गाड्या कर्मचाऱ्यांना भेट दिल्या आहेत. याविषयी पुढे वाचा.

चेन्नई स्थित सरमाउंट लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या निमित्ताने मोठी भेट दिली आहे. कंपनीने टाटाची कार, रॉयल एनफिल्ड बाईक आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर 20 कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिश्रम आणि समर्पणासाठी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या चांगल्या कामाचा सन्मान व्हावा, हा या भेटवस्तू देण्यामागचा हेतू होता.

या भेटवस्तूंमुळे कर्मचाऱ्यांना अधिक काम मिळेल. ते आपल्या कामात चांगली कामगिरी करतील. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीसाठी आणि यशासाठी कार, बाईक आणि स्कूटर भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. अशा भेटवस्तूंमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते आणि त्यांना कंपनीशी जोडल्याची चांगली अनुभूती मिळते.

लॉजिस्टिक्स कंपनीने दिलेली भेट

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देणाऱ्या सारमाउंट लॉजिस्टिक्सचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी लॉजिस्टिकच्या समस्या सोडवते. माल वाहतुकीतील दिरंगाई, पारदर्शकतेचा अभाव आणि पुरवठा साखळीशी संबंधित इतर समस्या सोडविण्याचे कामही ही कंपनी करते.

व्यापाऱ्यांना स्वस्त, जलद आणि पर्यावरणाविषयी जागरूक लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डेन्झिल रायन म्हणतात की त्यांचे ध्येय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व व्यापाऱ्यांसाठी लॉजिस्टिक्स सुलभ आणि प्रभावी बनविणे आहे.

डेन्झिल रायन म्हणाले की, जेव्हा कर्मचाऱ्यांचे त्यांच्या चांगल्या कामाबद्दल कौतुक केले जाते तेव्हा त्यांचे समाधान वाढते. यामुळे त्यांची काम करण्याची कामगिरीही सुधारते. जेव्हा कर्मचारी आनंदी असतात आणि त्यांचे मनोबल उंचावलेले असते, तेव्हा ते कंपनीसाठी अधिक चांगले काम करतात. एक मजबूत कर्मचारी कल्याण कार्यक्रम केवळ कर्मचाऱ्यांचे समाधान वाढवत नाही तर यामुळे कंपनीची उत्पादकता देखील वाढते.

सरमाउंट लॉजिस्टिक्सचे हे पाऊल म्हणजे कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि प्रेरणा केवळ त्यांचे मनोबलच वाढवत नाही तर कंपनीच्या वाढीस कशी मदत करते याचे एक उदाहरण आहे.

अशा प्रकारच्या पावलांमुळे कर्मचाऱ्यांचा आनंद तर वाढतोच, शिवाय कंपनीची कार्य संस्कृतीही मजबूत होते. कर्मचाऱ्यांना मिळालेल्या कार, बाईक आणि स्कूटरचे नेमके मॉडेल काय आहे आणि त्याची किंमत किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.