Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

छोट्या कारची एक वेगळीच मजा असते आणि ही बाब फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने सिद्ध केली आहे. (Citroen Micro Ami cargo car)

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 4:05 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Citroen Micro Ami cargo car launched with bigger space and power, check price and feature)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, फ्रान्सची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Citroen नेदेखील त्यांची एक इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. त्यानंतर कंपनीने आता त्यांची छोटी इलेक्ट्रिक कार Ami मिनीव्हॅनमध्ये कन्व्हर्ट केली आहे.

छोट्या कारची एक वेगळीच मजा असते आणि ही बाब फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने सिद्ध केली आहे. कंपनीने आपली मायक्रो अर्थात छोटी इलेक्ट्रिक कार Ami पूर्णपणे नवीन अवतारात सादर केली आहे. या टू – सीटर कारचे रूपांतर मिनीव्हॅनमध्ये करण्यात आले आहे, जेणेकरून यातून जास्तीत जास्त सामानाची ने-आण करता येईल. तथापि, या मिनी डिलिव्हरी मॉडेलची कल्पना नवीन नाही. याआधी रेनॉ कंपनीने असाच एक यशस्वी प्रयोग twizy कार्गोच्या बाबतीत केला आहे.

Citroen ने Ami मॉडेलला डिलिव्हरी वाहनात रूपांतरित करण्यासाठी दोनपैकी एक सीट काढून टाकली आहे आणि कार्गो एरिया ड्रायव्हरच्या बाजूला जोडला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन मॉडेल कुरिअर आणि सर्व्हिस कंपन्यांसाठी एक उत्तम ट्रांसपोर्ट मॉडेल बनू शकते.

Citroen Ami Cargo ची क्षमता

पॅसेंजर सीटला रीप्लेस करणाऱ्या ग्लोव्ह बॉक्सची स्टोरेज क्षमता 260 इतकी आहे. तसेच त्याची लोडिंग क्षमता 140 किलोग्रॅम इतकी आहे. चालकाच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये पार्टीशन करुन लोड (कार्गो किंवा साहित्य) वेगळं ठेवण्यात आलं आहे. Ami ही कार अधिक फंक्शनल बनवण्यासाठी कंपनीने यात स्टोरेजसह सेल्फही दिला आहे, ज्यामध्ये A4 डॉक्यूमेंट किंवा टॅबलेट ठेवता येईल. हा सेल्फ 40 किलोपर्यंतच्या वस्तू कॅरी करु शकतो. या इलेक्ट्रिक कारची एकूण क्षमता ही 400 लीटरची आहे.

या कारमध्ये 2-लेव्हल अ‍ॅडजस्टेबल फ्लोर दिला आहे आणि या कारमधून 1.2 मीटर लांबीच्या वस्तू ट्रान्सपोर्ट करता येतील. यामध्ये कार्गोला स्ट्रॅप्स किंवा नेटद्वारे (जाळी) प्रोटेक्ट करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. जेणेकरून कारचा दरवाजा उघडल्यानंतरही साहित्य खाली पडणार नाही.

Citroen Ami Cargo ची किंमत

Citroen Ami Cargo कार ही Ami micro कारच्या पॉवरट्रेनसह येते. यामध्ये 5.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. ही एका चार्जमध्ये 75 किमी पर्यंत धावू शकते आणि ताशी वेग 45 किमीपर्यंत वेगाने धावते. या कारचा आकार फक्त 2.41 मीटर आहे ज्यामुळे ती अधिक आरामदायक होते आणि ही कार शहरात सहज फिरवता येते. कंपनीने ही कार आपल्या देशांतर्गत बाजारात सादर केली असून या कारची किंमत 7,390 यूरो (अंदाजे 6.55 लाख रुपये) इतकी आहे.

संबंधित बातम्या

250cc गाड्यांना टक्कर देणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

प्रदूषण टाळण्यासाठी ‘हा’ देश केवळ इलेक्ट्रिक वाहनं विकणार, जाणून घ्या संपूर्ण योजना

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

(Citroen Micro Ami cargo car launched with bigger space and power, check price and feature)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.