जुनी दुचाकी द्या आणि नवी Hero Electric स्कूटर घेऊन जा, ‘या’ कंपनीची एक्सचेंज ऑफर

जुन्या दुचाकीच्या बदल्यात नवी इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन जाण्याची संधी ग्राहकांना दिली जात आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म CredR ने हिरो इलेक्ट्रिकसोबत भागिदारी करत ही एक्सचेंज ऑफर सादर केली आहे.

जुनी दुचाकी द्या आणि नवी Hero Electric स्कूटर घेऊन जा, 'या' कंपनीची एक्सचेंज ऑफर
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 4:53 PM

मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म CredR वर जुन्या दुचाकी वाहनांची ऑनलाईन विक्री केली जाते. CredR आता त्यांच्या व्यवसायाच्या कक्षा वाढवत आहे. CredR ने हिरो इलेक्ट्रिकसोबत (Hero Electric) मिळून पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांना ई-स्कूटर किंवा ई-बाईकद्वारे रिप्लेस करण्याची ऑफर सादर केली आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत या भागिदारीबाबत नुकतीच घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार ग्राहक त्यांची जुनी दुचाकी देऊन इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाऊ शकतात. ग्राहकांना त्यांची नवी स्कूटर काही दिवसांमध्ये मिळेल. (CredR and Hero Electric launches exchange offer on two wheelers)

तुम्ही जेव्हा तुमची जुनी दुचाकी घेऊन हिरो इलेक्ट्रिक शोरुममध्ये जाल, तेव्हा तिथे असलेली क्रेडआरची टीम तुमच्या बाईकचं/दुचाकीचं परिक्षण करेल. त्यानंतर तुमच्या जुन्या दुचीकीची तात्काळ खरेदी करण्यासाठीची रक्कम सांगितली जाईल (तुमच्याकडे असलेल्या जुन्या दुचाकीची किंमत ठरवली जाईल). ती रक्कम नव्या हिरो इलेक्ट्रिक स्कुटरच्या किंमतीमधून वजा केली जाईल. उर्वरित रक्कम भरून तुम्ही नवी हिरो इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता.

दरम्यान, क्रेडआरचे कर्मचारी तुमच्या जुन्या पेट्रोल वाहनाची सध्याची परिस्थिती आणि कागदपत्रांची तपासणी करतील. क्रेडआरची ही ऑफर सध्या पुणे, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर आणि बंगळुरु शहरात उपलब्ध आहे. लवकरच संपूर्ण भारतात ही ऑफर सुरु केली जाईल.

हिरोसोबतच्या नव्या पार्टनरशिपबद्दल बोलताना क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजिक ऑफिसर शशिदर नंदिगम म्हणाले की, देशभरातील दुचाकींच्या एकूण संख्येचा विचार केला तर त्यात इलेक्ट्रिक स्कुटरचं प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आहे. हे प्रमाण वाढवायला हवं. अशा परिस्थिती या क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या हिरो इलेक्ट्रिकशी भागिदारी केल्यामुळे नव्या व्यवसायासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शशिधर म्हणाले की, COVID-19 पॅन्डेमिकनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत मोठे बदल होत आहेत, तसेच विक्रीदेखील वाढेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळात दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे सेकंड हॅड टू व्हिलर्सच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोहिंदर गिल म्हणाले की, क्रेडआरच्या युनिक लीजिंग आणि लो इन्स्टॉलमेंटवाल्या इन्स्टंट एक्सचेंज स्किममुळे अधिकाधिक लोकांना हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास मदत मिळेल.

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

सणासुदीच्या दिवसांमध्ये Hero Super Splendor घरी आणा, कंपनीकडून तीन मोठ्या ऑफर्स

1 लिटर पेट्रोलमध्ये 95 किलोमीटर धावणार; दिवाळीत खरेदी करा ‘या’ चार बाईक

(CredR and Hero Electric launches exchange offer on two wheelers)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.