नवीन Tata Safari 2021 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल
टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे.
मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे. Tata Safari 2021 SUV ची सुरुवातीची किंमत 14.69 लाख रुपये (एक्स शो-रूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. टाटा मोटर्स कंपनीने काही आठवड्यांपूर्वी ही कार सादर केली होती. तसेच या कारचं बुकिंगदेखील सुरु करण्यात आलं आहे. कंपनीने नवीन टाटा सफारी 6 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांसह लाँच केली आहे. दरम्यान, ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. या कारला देशभरात असलेली मागमी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळेच या कारसाठीचा वेटिंग पिरियडदेखील वाढला आहे. (Customers has to wait for 1.5 months to Buy All new Tata Safari 2021)
टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात देशभरात नवीन टाटा सफारीच्या 1,707 युनिट्सची डिलीव्हरी केली आहे. Orcus व्हाइट आणि रॉयल ब्लू पेंट कॉम्बिनेशनसह येणाऱ्या सफारीच्या टॉप ट्रिमला (XZA+) सर्वाधिक मागणी आहे. XZA+ वेरिएंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. तर सफारीच्या अॅडव्हेंचर पर्सोना XZ+ मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 20.20 लाख आणि 21.45 लाख रुपये इतकी आहे. या सर्व किंमती एक्स शोरुममधल्या आहेत. दरम्यान, टाटा सफारीच्या काही वेरिएंट्सना इतकी मागणी आहे की, या कारचा वेटिंग पिरियड 45 दिवस म्हणजेच 1.5 महिने इतका झाला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन टाटा सफारी खरेदी करायची असल्यास दिड महिने वाट पाहावी लागेल.
90 च्या दशकात भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी टाटा सफारी आता अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञानासह आपल्या भेटीला आली आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी जाहीर केले की दिल्ली NCR मध्ये एकाच दिवसात या कारच्या 100 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, लोकांकडून सफारीच्या XZA+ ट्रिम रॉयल ब्लू आणि Orcus White hues या व्हेरिएंट्सना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
सहा व्हेरियंट्ससह सफारी दाखल
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
अशी आहे All New Tata Safari 2021
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स
हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
रूफ रेल्स
2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.
बॉस मोड
बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
टिल्ट आणि टेलीस्कोपिक स्टियरिंग व्हील
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स
सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
सेफ्टी टच
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.
दमदार इंजिन
या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.
Nissan Magnite च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ https://t.co/YytbA7nrkU #nissanmagnite #CarPrice #Auto #SuvPrice
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
इतर बातम्या
Volkswagen च्या ‘या’ शानदार SUV चं भारतात कमबॅक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Nissan Magnite च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ
1.6 लाखात खरेदी करा Alto 800, जाणून घ्या काय आहे ऑफर?
(Customers has to wait for 1.5 months to Buy All new Tata Safari 2021)