सिंगल चार्जवर 180 किमी रेंज, Cyborg ची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च

देशांतर्गत स्टार्टअप कंपनी, इग्निट्रॉन मोटोकॉर्पने (Ignitron Motocorp) अलीकडेच त्यांच्या सायबॉर्ग (Cyborg) ब्रँड अंतर्गत तिसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक लाँच केली आहे. सायबॉर्ग जीटी 120 (Cyborg GT 120) असे या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकचे नाव आहे.

सिंगल चार्जवर 180 किमी रेंज, Cyborg ची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च
Cyborg GT 120
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:42 AM

मुंबई : देशांतर्गत स्टार्टअप कंपनी, इग्निट्रॉन मोटोकॉर्पने (Ignitron Motocorp) अलीकडेच त्यांच्या सायबॉर्ग (Cyborg) ब्रँड अंतर्गत तिसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक लाँच केली आहे. सायबॉर्ग जीटी 120 (Cyborg GT 120) असे या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकचे नाव आहे. ही बाईक ब्लॅक आणि डार्क पर्पल या दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. GT 120 मध्ये 4.68 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे जी 180 किमीची रेंज देते आणि जास्तीत जास्त 125 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते. या बाईकमध्ये जिओ लोकेट/जिओ फेन्सिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन आणि डिजिटल क्लस्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ही स्वदेशी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक सिंगल चार्जमध्ये 180 किमीपर्यंतची रेंज देते असा दावा केला जात आहे. Cyborg GT 120 2.5 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास इतका वेग धारण करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. याशिवाय, कंपनी सायबोर्ग लाइनअपमध्ये दोन बाइक्स विकते, ज्यामध्ये सायबोर्ग योग (Cyborg Yoga) आणि सायबोर्ग बॉब ई (Cyborg Bob E) या दोन गाड्यांचा समावेश आहे. नवीन Cyborg GT 120 तीन राइडिंग मोडसह येईल.

Cyborg GT 120 ची भारतातील किंमत

नवीन लाँच झालेल्या Cyborg GT 120 ची किंमत आणि बुकिंग डीटेल्स पुढील महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ही बाईक ब्लॅक आणि पर्पल या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. मोटार, बॅटरी आणि वाहनावर 5 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

Cyborg GT 120 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Cyborg GT 120 मध्ये ब्रशलेस DC मोटरसह 4.68kWhr लिथियम-आयन बॅटरी आहे जी 6kW पीक पॉवर जनरेट करते आणि 125kWh च्या टॉप स्पीडपर्यंत जाऊ शकते. इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक असल्याने ती 2.5 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग धारण करु शकते. Cyborg GT 120 ची रेंज सिंगल चार्जवर 180 किमी पर्यंत आहे. 15A फास्ट होम चार्जर वापरून बॅटरी 5 तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. बॅटरी वेदरप्रूफ आणि टच सेफ आहे.

Cyborg GT 120 ला कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंगसह समोरील बाजूस डिस्क ब्रेक मिळतो. इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइकला जिओ-फेन्सिंग, जिओ-लोकेशन, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळते. क्लस्टरमध्ये एक LED डिस्प्ले आहे जो रायडरला उर्वरित बॅटरी लाइफ देखील दर्शवतो. डिस्प्लेला धूळ आणि पाण्याच्या रेजिस्टन्ससाठी IP65 रेटिंग देखील मिळाली आहे.

इग्निट्रॉन मोटोकॉर्पची (Ignitron Motocorp) इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक तीन रायडिंग मोड्ससह येते, यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. बाईकला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस पूर्णपणे अॅडजस्टेबल मोनो-शॉक मिळतात. ही बाईक रिव्हर्स मोडसह सुसज्ज आहे आणि त्यामध्ये पार्किंग असिटन्स मिळते, ज्यामुळे रायडरला अलर्ट करण्यासाठी विविध प्रकारचे आवाज देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…

Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!

Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!

(Cyborg launches high speed electric bike GT 120 in India. Know details)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.