Petrol vs Power Petrol : रेगुलर आणि पावर पेट्रोलमध्ये फरक काय? थंडीत कुठलं पेट्रोल वापरणं फायद्याचं?
Petrol vs Power Petrol : रेगुलर आणि पावर पेट्रोलमध्ये थंडीत कुठलं पेट्रोल कारसाठी चांगलं आहे?. त्याशिवाय कारच्या मायलेजवर काय परिणाम होतो? वेगवेगळ्या फ्यूल टाइपबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असतील, त्यांची उत्तर तुम्हाला इथे मिळतील.
तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर जाता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे फ्यूल ऑप्शन्स मिळतात. फ्यूल प्राइस सुद्धा वेगवेगळी असते. किमतीमध्ये फरक असेल, तर क्वालिटीमध्ये सुद्धा फरक पडतो. रेगुलर आणि पावर पेट्रोलमध्ये काय डिफरन्स आहे?. थंडीच्या सीजनमध्ये तुमच्या कारसाठी पावर पेट्रोल फायद्याच ठरतं. याने कारचा मायलेज आणि परफॉर्मन्स सुधारतो. हे सर्व कसं होतं, ते खाली डिटेल्स आणि फरक समजून घ्या. पावर पेट्रोलची वेगवेगळी नावं आहेत. पेट्रोल पंपावर तुमचा गोंधळ होऊ नये, यासाठी सगळ्या नावांवर एकदा नजर मारुन घ्या. पेट्रोलला पावर शिवाय एक्स्ट्रा माइल, हाय स्पीड आणि स्पीड अशी सुद्धा नावं दिली जातात.
कुठलं चांगलं म्हणून तुम्ही, जर दोन्ही फ्यूल टाइपमध्ये कंफ्यूज असाल, तर इथे तुमच्या सर्व शंका दूर होतील. पावर पेट्रोल एक प्रीमियम फ्यूल आहे. नॉर्मल आणि पावर पेट्रोलमध्ये फरक आहे. पावर पेट्रोलमध्ये ऑक्टाइन लेवल जास्त असते. नॉर्मल पेट्रोलमध्ये ऑक्टाइन लेवल 87 असते. तेच पावर पेट्रोलमध्ये 91 ते 94 ऑक्टाइन लेवल असते. आता तुम्ही विचार करत असाल हे ऑक्टाइन काय असतं.
ऑक्टाइन काय असतं?
ज्या पेट्रोलमध्ये जास्त ऑक्टाइन असतं ते इंजिनमध्ये इंजन-नौकिंग आणि डेटोनेटिंगच काम करतं. इंजन-नौकिंग आणि डेटोनेटिंगमुळे इंजिनातून येणारा आवाज कंट्रोलमध्ये राहतो. ऑक्टाइनमुळे इंजिन आपल्या पूर्ण क्षमतेने काम करते.
Power Petrol चे फायदे
पावर पेट्रोल नॉर्मल पेट्रोलपेक्षा थोडं महाग असतं. पण या पेट्रोलचे अनेक फायदे असतात. तुम्ही वाहनात पावर पेट्रोल भरलं, तर मायलेज वाढतो. त्याशिवाय इंजिनचा परफॉर्मन्स आधीपेक्षा सुधारतो. थंडीत कोल्ड स्टार्ट परफॉर्मेंसच्या दृष्टीने तुमच्यासाठी पावर पेट्रोल एक चांगला ऑप्शन आहे.