Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरच हार्ले-डेविडसनशी कनेक्शन, भारतात ही बाईक स्वस्त होणार का?
Donald Trump : हार्ले डेविडसनने 2009 साली भारतात बाईक्स विकायला सुरुवात केली. ही प्रीमियम सेगमेंटमधील बाईक आहे. त्यावेळी भारतात या बाईक्सची कमी डिमांड होती. कंपनीने 2010 साली डीलरशिप सुद्धा ओपन केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कॅनडा आणि मेक्सिकोवरुन आयात केल्या जाणाऱ्या सामानावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. असं करुन त्यांनी जगात टॅरिफ वॉर सुरु केलय. ट्रम्प यांच्या रडारवर युरोपियन युनियन, चीन आणि भारत सुद्धा आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का, या टॅरिफ वॉरच एक कनेक्शन हार्ले-डेविडसन बाइक आणि भारतातील त्यांच्या सेल्सशी संबंधित आहे.
प्रेसशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका रेसिप्रोकल टॅरिफ लावणार असल्याच जाहीर केलं. सोप्या शब्दात समजून घ्यायच झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांना असं म्हणायचं आहे की, कुठलाही देश अमेरिकेच्या सामनावर जे आयात शुल्क आकारेल, त्या देशातून अमेरिकेत मागवल्या जाणाऱ्या सामानावर अमेरिका सुद्धा तसाच टॅरिफ आकारेल. हाच टॅरिफ समजावताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील हार्ले डेविडसनच्या सेल्सचा उल्लेख केला.
टॅक्स वाचवण्यासाठी भारतात कारखाना सुरु केला
“आता आपण एक रेसिप्रोकल टॅरिफ नेशन बनलो आहोत. आता आपण तेच करणार, जे आपल्यासोबत होणार. भारत आपल्याकडून जितका कर घेणार, आपणही त्यांच्याकडून तितकाच टॅक्स वसूलणार. माझ्या दृष्टीने हे योग्य आहे. माझ्या लक्षात आहे की, हार्ले डेविडसनला भारतात त्यांच्या बाईक्स विकता आल्या नव्हत्या. कारण तिथे टॅक्स भरपूर आहे. तेच हार्ले डेविडसनला तिथे बाईक्स उत्पादन सुरु करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. त्यांनी टॅक्स वाचवण्यासाठी भारतात कारखाना सुरु केला. आता आम्ही सुद्धा असचं करणार आहोत” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
आयातीवर 100 टक्के टॅक्स
हार्ले डेविडसनने 2009 साली भारतात बाईक्स विकायला सुरुवात केली. ही प्रीमियम सेगमेंटमधील बाईक आहे. त्यावेळी भारतात या बाईक्सची कमी डिमांड होती. कंपनीने 2010 साली डीलरशिप सुद्धा ओपन केली. हार्ले डेविडसनच्या कंप्लीट बिल्ट यूनिटच्या आयातीवर 100 टक्के टॅक्स लागायचा. काही वर्षांनी कंपनीने हरयाणाच्या बवालमध्ये आपला असेंबली प्लांट सुरु केला. तिथे Street 500 आणि 750 सारखे मॉडल बनवायला सुरुवात केली.
Harley Davidson X440 ची किंमत किती?
सप्टेंबर 2020 मध्ये हार्ले डेविडसनने भारतातील आपला कारोबार गुंडाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कंपनीने हीरो मोटोकॉर्प सोबत मिळून पार्टनरशिपमध्ये बाइक्स विकणं सुरु ठेवलं. हार्ले डेविडसनवर असलेल्या हाय टॅक्सचा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही उपस्थित केला होता. आता ते टॅरिफ वॉरबद्दल बोलत आहेत. भारत हार्ले डेविडसनच्या आयात मॉडलवर टॅक्स कमी करु शकतो. त्यामुळे या बाइक्स स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे. आता हिरोसोबत मिळून 2023 मध्ये हार्ले डेविडसनने एक नवीन बाइक लॉन्च केली. Harley Davidson X440 याची एक्स-शोरूम प्राइस 2.30 लाख रुपए आहे.