Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car : पाण्यात कार फसल्यावर चुकूनही ‘या’ चुका करुन नका… इंजिनपासून गिअर बॉक्सपर्यत होईल नुकसान

जास्त पाउस झाल्यावर रस्त्यालाच नद्यांचे स्वरुप येत असते. अशात अनेकदा कार ड्रायव्हिंग करायला समस्या निर्माण होत असते.

Car : पाण्यात कार फसल्यावर चुकूनही ‘या’ चुका करुन नका... इंजिनपासून गिअर बॉक्सपर्यत होईल नुकसान
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:41 AM

मुंबई : उन्हाळा (Summer) संपण्यात जमा आहे. सर्वांनाच पावसाळ्याचे वेध लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होणार आहे. मान्सून आल्याने नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात आराम मिळत असला तरी अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टीमुळे (Heavy rain) नागरिकांची दाणादाण उडत असते. अनेक वेळा नालेसफाई नीट झालेली नसल्याने मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटीमध्ये रस्त्यावरच पाणी साचत असते. जास्त पाउस झाल्यावर रस्त्यालाच नद्यांचे स्वरुप येत असते. अशात अनेकदा कार ड्रायव्हिंग (Car driving) करायला समस्या निर्माण होत असते. जर अशात तुमच्या चारचाकीला संपूर्णपणे पाण्याने वेढल्यास तुमच्यासमोर अनेक समस्या निर्माण होत असतत. यातून वाचण्यासाठी व कारचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही काही टीप्स सांगणार आहोत.

पाण्याने वेढलेला रस्ता टाळा

काही रस्त्यांवर पावसाळ्यात नेहमीच पाणी तुंबत असते. अशा वेळी तुम्ही अशा रस्त्यांवर पाणी साचलेले असताना त्या ठिकाणाहून जाणे टाळले पाहिजे. अनेक एसयुव्ही कार निर्मात्या कंपन्यांचा दावा आहे की, त्यांची कार ठराविक पाणी पातळी असलेल्या रस्त्यावरुनही सहज जाउ शकते. परंतु खरे तर अर्धाफूटापेक्षा जास्त पाणी असलेल्या ठिकाणाहून कुठल्याही कारला जाणे सहज शक्य नसते. अशा वेळी तुम्ही रस्त्याचा आढावा घेउनच त्यावरुन जावे.

हे सुद्धा वाचा

सलग प्रवास सुरु ठेवा

जर तुम्हाला पाण्याने वेढलेल्या रस्त्यावरुन जावेच लागत असेल तर, पाण्यात कधीही गाडी थांबवू नका, रस्त्यावर पाणी असले तरी कार चालवत रहा. कार चालवताना अचानक स्पीड वाढवणे, कमी करणे यापासून वाचून रहा. कार पाण्यात एका जागी थांबवू नका, अशाने कारच्या इंटेक एक्जहॉस्टमध्ये पाणी जाण्याचा धोका वाढू शकतो.

कार बंद झाल्यावर रिस्टार्ट करु नका

पाण्यात जर कार अचानक बंद झाली तर तीला पुन्हा रिस्टार्ट करु नका. पाण्यामुळे इंजिनच्या कनेक्टिंग रोडवर दबाव पडतो. तसेच इंटेक किंवा एक्जहॉस्टमध्ये पाणी भरले गेल्यानेही कार मध्येच बंद पडू शकते. जर अशात तुम्ही पुन्हा रिस्टार्ट केल्यास इंजिनचे नुकसान होउ शकते.

कारमध्ये अडकल्यावर घाबरु नका

पुरामुळे जर तुम्ही कारमध्ये फसले असाल तर, पाण्याच्या दबावामुळे कारचे दरवाजे उघडत नाहीत. अशा वेळी न घाबरता मन शांत ठेवून दोन्ही पायांच्या मदतीने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा. या शिवाय कारमधील कुठल्याही कडक वस्तूने दरवाजाच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक दाबून पाणी काढा बाहेर

पाण्याने वेढलेल्या रस्त्यात जर तुमची कार अडकली असेल तर कारच्या विविध भागात पाणी शिरण्याचा धोका असतो. अशा वेळी तुम्ही ब्रेकचा चांगल्या पध्दतीने वापर करुन शकतात. ब्रेक दाबून त्या ठिकाणी जमा झालेले पाणी तुम्ही गाडीच्या बाहेर काढू शकतात. पाणी जर त्याच ठिकाणी साचून राहिले तर, नंतर ब्रेक लावायला अडचणी येउ शकतात.

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.