कोची : भारतात इलेक्ट्रिक वाहने खूप लोकप्रिय होत आहेत. गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक दुचाकी आणि कार या दोन्हींच्या मागणीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये अनेक नवीन कंपन्यांनी एंट्री घेतली आहे. अलीकडे अनेक सेलिब्रिटींनीही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. जीतू यांनी अलीकडेच त्याच्या गॅरेजमध्ये दोन इलेक्ट्रिक वाहने जोडली आहेत. त्यापैकी एक MG ZS EV आणि दुसरी TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर आहे. (Drishyam director Jeethu Joseph buy MG ZS EV electric car and TVS iQube scooter)
जीतू जोसेफ हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत. ‘दृश्यम’ हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या दिग्दर्शकाने त्याच्या MG ZS EV आणि TVS iQube चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, MG मोटर कंपनीने MG ZS EV ची 2021 मधील अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल केलं. MG ZS EV सध्या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यात एक्साइट आणि एक्सक्लुझिव्ह ट्रिम्सचा समावेश आहे. Excite हे बेस व्हेरिएंट आहे तर Exclusive हे टॉप-एंड व्हेरिएंट आहे.
पेट्रोल इंजिनसह एमजी झेडएस प्रमाणेच ईव्हीमध्येदेखील नवीन शार्प एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रिल स्वतंत्रपणे देण्यात आलेलं नाही, यातील ग्रिल बंपरचाच एक भाग आहे आणि तो कारच्या बॉडी कलरमध्ये आहे. बॅक पॅनेलवर असलेल्या प्रोफाइलमध्ये थोडासा बदल देखील केला आहे. यामध्ये अलॉय व्हील्सही अपडेट करण्यात आले आहेत.
MG ZS EV या कारमध्ये कंपनीने 72 kWh ची मोठी बॅटरी वापरली आहे, जी सिंगल चार्जवर 439 किमी रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारचे सध्याचे मॉडेल सिंगल चार्जवर 262 किमीचे अंतर कापू शकते. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षापर्यंत 51 kWh बॅटरी पॅक लॉन्च केला जाईल, जो सिंगल चार्जवर 318 किमीचे अंतर पार करू शकेल.
TVS iQube ची ऑन-रोड किंमत 1.10 लाख रुपये इतकी आहे. टीव्हीएसचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जवर 75 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर, ही स्कूटर शून्य ते 40 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी 4.2 सेकंद घेते. स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास इतका आहे. TVS iQube मध्ये 4.4 इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली असून पूर्ण चार्ज होण्यासाठी ही 5 तासांचा वेळ घेते. कंपनी TVS iQube सोबत 3 वर्ष किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते.
इतर बातम्या
Mileage Cars : सेलेरियो ते टाटा पंच.., 2021मध्ये लॉन्च झालेल्या ‘या’ आहेत जबरदस्त टॉप पेट्रोल कार
NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna सपशेल नापास, कारला 0-स्टार सेफ्टी रेटिंग
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत
(Drishyam director Jeethu Joseph buy MG ZS EV electric car and TVS iQube scooter)