आता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत
वाहन परवाना काढण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.
नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे (Corona epidemic) लोकांची अनेक कामं लांबणीवर पडली. पण आता सगळं काही पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे आता महत्त्वाची ऑफिसं आणि व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. अशात जर तुम्हाला वाहन परवाना (Driving License) रिन्यू करायचा असेल तर तोदेखील आता सोप्या पद्धतीने करता येणार आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. (driving license renew online will be done in just 5 steps)
कोरोनाचा धोका आणि वाढती लोकांची गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म डाऊनलोड करुन भरावा लागेल आणि मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. इतकंच नाही तर जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए आवश्यक असणार आहे. यामध्ये जुनं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोदेखील अपलोड करावा लागणार आहे.
वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी काय आहे पद्धत ?
– ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.
– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.
– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल. (driving license renew online will be done in just 5 steps)
संबंधित बातम्या –
टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?
FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!
(driving license renew online will be done in just 5 steps)