प्रदूषणावर मात करण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर DTC च्या 300 इलेक्ट्रिक बसेस धावणार, जाणून घ्या खासियत
नवीन वर्षाच्या सुरुवातीला डीटीसी (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) इलेक्ट्रिक बस सादर करु शकते. लवकरच या बसेस दिल्लीतल्या रस्त्यांवर धावताना दिसतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ई-बसला हिरवा कंदील दाखवून लवकरच दिल्लीतील जनतेला ई-बस भेट देणार आहेत.
1 / 5
नवीन वर्षाच्या सुरुवातीला डीटीसी (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) इलेक्ट्रिक बस सादर करु शकते. लवकरच या बसेस दिल्लीतल्या रस्त्यांवर धावताना दिसतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ई-बसला हिरवा कंदील दाखवून लवकरच दिल्लीतील जनतेला ई-बस भेट देणार आहेत. ई-बसच्या मदतीने दिल्लीतील वाढते प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. येत्या काळात अशा 300 बसेस दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळतील.
2 / 5
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्विट करून 'दिल्ली मुबारक हो', असे म्हटले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, DTC च्या पहिल्या 100% इलेक्ट्रिक बसचा प्रोटोटाइप समोर आला आहे. या ट्विटमध्ये मंत्र्यांनी बसचा फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये बस बाहेरून आणि आतून कशी असेल ते दाखवण्यात आली आहे.
3 / 5
PTI या वृत्तसंस्थेनुसार, DTC 300 बस खरेदी करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून त्यांची डिलिव्हरी सुरू होणार होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे डिलीव्हरीला उशीर झाला आहे.
4 / 5
सध्या, डीटीसी दिल्लीमध्ये सीएनजी बस चालवत आहे, ज्या डिझेल आणि पेट्रोल इंजिनांप्रमाणे जास्त प्रदूषण करत नाहीत.
5 / 5
DTC बोर्डाने 1015 इलेक्ट्रिक लो फ्लोअर एअर कंडिशन बसेसना मान्यता दिली आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर देखील लाँच होत आहेत.