Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डुकाटीने Streetfighter V2 वरुन पडदा हटवला, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास

डुकाटीने नवीन 2022 स्ट्रीटफायटर V2 (Ducati Streetfighter V2) मोटरसायकलचे अनावरण केले आहे. नवीन स्ट्रीटफायटर V2 ही बाईकदेखील Panigale V2 सारख्याच प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे.

डुकाटीने Streetfighter V2 वरुन पडदा हटवला, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास
Ducati Streetfighter V2
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:30 AM

मुंबई : डुकाटीने नवीन 2022 स्ट्रीटफायटर V2 (Ducati Streetfighter V2) मोटरसायकलचे अनावरण केले आहे. नवीन स्ट्रीटफायटर V2 ही बाईकदेखील Panigale V2 सारख्याच प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. (Ducati Streetfighter V2 splendid motorcycle unveils, check price and features)

नवीन Streetfighter V2 चे एक्स्टीरियर त्याच्या मोठ्या काउंटरपार्ट वर बेस्ड आहे. हेडलॅम्प असेंब्ली थेट स्ट्रीटफाइटर V4 कडून घेतलेली दिसते. तर इतर भाग जसे की, फ्यूल टँक, टेल सेक्शन आणि चाके Panigale V2 सारखीच आहेत. नवीन बाईकवरील अलॉय व्हील Panigale V2 प्रमाणेच आहेत आणि Pirelli Diablo Rosso 4 टायर्ससह येतात. याला ऑप्शनल विंग्स देखील मिळतात जे 265kph वेगाने 27kg डाउनफोर्स तयार करण्यास सक्षम आहेत.

दमदार इंजिन

नवीन Ducati Streetfighter V2 च्या सेंटरला 955cc, Superquadro, ट्विन-सिलेंडर इंजिन आहे. विशेष म्हणजे हेच इंजिन Panigale V2 मध्येदेखील वापरण्यात आले आहे. हे इंजिन अनुक्रमे 153hp पॉवर आणि 101.5Nm पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ट्रान्समिशनमध्ये अप/डाउन क्विकशिफ्टरसह 6 स्पीड गिअरबॉक्स समाविष्ट आहे.

हे पॉवरट्रेन कास्ट अॅल्युमिनियम मोनोकॉक फ्रेमखाली ठेवलं आहे. Streetfighter V2 वरील सिंगल साइड स्विंगआर्म Panigale V2 पेक्षा 16mm लांब आहे. एकूण वजनाच्या बाबतीत, नवीन मोटरसायकलचे वजन 178 किलो आहे जे Panigale V2 पेक्षा 2 किलोने जास्त आहे.

Ducati Streetfighter V2 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन स्ट्रीट फायटरमधील काही प्रमुख इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, तीन पॉवर मोड (हाय, मीडियम, लो) आणि तीन राइड मोड (वेट, रोड आणि स्पोर्ट), व्हीली कंट्रोल, तसेच इंजिन ब्रेकिंग यांचा समावेश आहे. बाईकचा मीटर कन्सोल हा 4.3 इंचाचा कलर टीएफटी क्लस्टर आहे जो सर्व सेटिंग्ज आणि मोड अॅक्सेस करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सस्पेन्शनसाठी, बाईकमध्ये पूर्णपणे अॅडजस्टेबल 43 मिमी शोवा बिग पिस्टन USD फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक वापरण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Ducati Streetfighter V2 splendid motorcycle unveils, check price and features)

मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....