Diwali Car purchase | 6 लाखांची ‘ही’ कार मार्केटमध्ये फेवरेट, BMW पेक्षा जास्त मायलेज
Diwali Car purchase | दिवाळीत कार खरेदीचा विचार करत असाल, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. 6 लाखाच तुमच बजेट असेल, तर ही नंबर 1 कार आहे. मायलेजमध्ये सुद्धा ही कार उत्तम देते. मागच्या महिन्यातील देशातील कार विक्रीचे आकडे पाहिले, तर एकाच कंपनीच्या दोन cars ना ग्राहकांनी विशेष पंसती दिलीय.
Cars Under 6 Lakhs : दिवाळीत नव्या कार खरेदीचा प्लान असेल, तर मार्केटमध्ये अनेक ऑप्शन आहेत. हॅचबॅक, सिडॅनपासून SUV सारख्या तमाम cars वर ऑफर दिल्या जात आहेत. तुमचं बजेट 6 लाख रुपयापर्यंत असेल, तर तुम्ही या किंमतीत एक उत्तम कार खरेदी करु शकता. ही कार Maruti Suzuki Swift आहे. 6 लाख रुपये किंमतीत Tata Punch आणि Hyundai Exter सारख्या शानदार cars येतात. पण मारुति स्विफ्ट यात बेस्ट ऑप्शन आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या cars ची विक्री झाली, ते आकडे काय सांगतायत. मागच्या महिन्यात भारतात Maruti WagonR कारची सर्वाधिक विक्री झाली. त्यानंतर मारुती स्विफ्टचा नंबर येतो. 6 लाख रुपये एक्स-शोरुम प्राइसचा विचार केल्यास या सेगमेंटमध्ये मारुति स्विफ्ट, टाटा पंच आणि हुंडई एक्सटर सारख्या cars उपलब्ध आहेत.
Maruti Swift च्या सेलबद्दल बोलायच झाल्यास ऑक्टोबर 2023 मध्ये 20,598 लोकांनी स्विफ्ट कार विकत घेतली. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत मारुती स्विफ्ट कारच्या विक्रीमध्ये 20 टक्के वाढ झालीय. ऑक्टोबर 2022 मध्ये Maruti Swift च्या फक्त 17,231 यूनिट्सची विक्री झाली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये मारुती वॅगनर कारच्या 22,080 यूनिट्सची विक्री झाली. भारतातील ही सर्वाधिक विक्री झालेली कार आहे.
Tata Punch and Hyundai Exter चा सेल
मागच्या महिन्यात टाटाची ढासू मायक्रो एसयूवी पंच कारच्या 15,317 यूनिट्सची विक्री झाली. हुंडई एक्सटरचे ऑक्टोबर 2023 मध्ये 8,097 यूनिट्स विकण्यात आले. मारुति स्विफ्ट हॅचबॅक कार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. टाटा पंच आणि हुंडई एक्सटरची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइस 5.99 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Swift इंजिन आणि मायलेज
मारुति सुजुकी स्विफ्टच्या स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायच झाल्यास ही कार 1197 cc पेट्रोल इंजिनसह येते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन मिळतात. तुम्हा हव असल्याच या कारच तुम्ही CNG वर्जन सुद्धा खरेदी करु शकता. या कारचा देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये समावेश होतो. CNG वर स्विफ्ट 30.90 किमी/किलोग्रॅमचा मायलेज देऊ शकते. पेट्रोलवर या कारचा मायलेज 20.38 किमी/लीटर आहे. BMW ची कुठलीही कार इतका मायलेज देत नाही.