Maruti Suzuki | दिवाळीसाठी ‘ही’ आहे मारुतीची बेस्ट सेलिंग कार, मिळेल 49 हजारांचा डिस्काऊंट

Maruti Suzuki | Maruti Suzuki ची ही हॅचबॅक कार ग्राहकवर्गात खूप पॉप्युलर आहे. मागच्या महिन्यात या कारला ग्राहकांची पहिली पसंती होती. हॅचबॅकच्या एकूण 22 हजार 80 यूनिट्सची विक्री झाली. आकड्यांवरुन या कारबद्दल ग्राहकांमध्ये किती क्रेज आहे, ते दिसून येतं.

Maruti Suzuki | दिवाळीसाठी 'ही' आहे मारुतीची बेस्ट सेलिंग कार, मिळेल 49 हजारांचा डिस्काऊंट
Maruti Suzuki cars
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 12:35 PM

मुंबई : सध्या दिवाळीचा फेस्टिव सीजन आहे. सणासुदीच्या दिवसात लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. विविध ग्राहकपयोगी वस्तूंसोबतच नागरिक वाहनांची सुद्धा खरेदी करतात. दिवाळीच्या दिवसात वस्तूंप्रमाणे वाहनांवर सुद्धा मोठा डिस्काऊंट दिला जातो. सध्याच्या फेस्टिव सीजनमध्ये ऑटो कंपन्या आपल्या पॉप्युलर मॉडल्सवर बंपर डिस्काऊंट देत आहेत. तुम्ही Maruti Suzuki कंपनीची Car विकत घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे पैसे वाचवण्याची एक चांगली संधी आहे. मागच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ही सर्वाधिक विकली गेलेली कार आहे. मारुतीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या हॅचबॅक मॉडलवर कंपनीकडून 49 हजारपर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. तुम्ही मारुती सुझूकी कंपनीची WagonR कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा फायदा आहे.

WagonR च्या खरेदीवर मारुतीने 49 हजारचा डिस्काऊंट दिला आहे. या गाडीबाबत मिळणाऱ्या बेस्ट डीलसंबंधी तुम्हाला माहिती देतो. नोव्हेंबर महिन्यात Maruti Suzuki च्या WagonR कारवर कंपनीकडून कंपनीकडून 25 हजारापर्यंत कॅश डिस्काऊंट, जुनी कार दिल्यास 20 हजाराचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळेल. म्हणजे WagonR कार तुम्ही नोव्हेंबरमध्ये खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुमची 49 हजार रुपयापर्यंत बचत होईल.

विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले

मागच्या महिन्यात WagonR कारला ग्राहकांची पहिली पसंती होती. हॅचबॅकच्या एकूण 22 हजार 80 यूनिट्सची विक्री झाली. मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये विक्रीचा आकडा 17 हजार 945 यूनिट्स होता. आकड्यांवरुन या कारबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेज असल्याच स्पष्ट होतं. त्यामुळेच मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कार विक्रीत 23 टक्के वाढ दिसून आलीय.

Maruti Suzuki WagonR Price ची किंमत

तुम्ही मारुती सुजुकीची हॅचबॅक कार विकत घ्यायचा विचार करत असाल, तर या गाडीची किंमत (एक्स-शोरूम) 5 लाख 54 हजार 500 रुपयापासून सुरु होते. 7 लाख 30 हजार 500 रुपयापर्यंत (एक्स-शोरूम) या कारची प्राइस आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.