एमजी अॅस्टरच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये मिळणार टच-स्क्रीन फीचर
कंपनी सतत एमजी अॅस्टरची चाचणी करत आहे. अलीकडेच ही एसयूव्ही पर्वतराजींमध्ये चाचणी करताना दिसली आहे. एमजी मोटर अनेक वेगवेगळ्या भागात नवीन अॅस्टर एसयूव्हीची चाचणी करत आहे. चाचणीदरम्यान या कारची काही छायाचित्रेही समोर आली आहेत.
मुंबई : एमजी मोटर इंडिया येणाऱ्या आठवड्यांमध्ये आपली नवीन एमजी अॅस्टर ही स्पोर्ट्स युटिलिटी कार लाँच करणार आहे. या कारच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये आता टच-स्क्रीन उपलब्ध असणार आहे. तसेच अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो नवीन एमजी अॅस्टरमध्ये मानक म्हणून उपलब्ध असतील. कंपनीने आज याबाबत घोषणा केली आहे. कंपनी आपल्या कारच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये हे वैशिष्ट्य देणार आहे. (Each variant of the MG Aster will have a touch-screen feature)
एमजी अॅस्टर ही देशातील एआय कनेक्टेड कार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळणार आहे. अलीकडेच कंपनीने हेही उघड केले की, या कारमध्ये प्रथमच वैयक्तिक एआय सहाय्यक आणि सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल-2 तंत्रज्ञानात प्रथम या कारमध्ये वापरले जाईल. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोबद्दल बोलायचं तर ते कार मालकाच्या मोबाईल फोनशी कनेक्ट होऊ शकेल. त्यानंतर कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये अविरत प्रवेश करता येईल. ही प्रणाली हे सुनिश्चित करते की, कार चालक स्टीअरिंग व्हीलवर हात ठेवताना आणि रस्त्यावर लक्ष ठेवताना कारच्या सर्व वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करु शकतो. कंपनी ही कार 10.25 इंच डिस्प्लेसह बाजारात आणेल.
चाचणीदरम्यानची छायाचित्रे व्हायरल
कंपनी सतत एमजी अॅस्टरची चाचणी करत आहे. अलीकडेच ही एसयूव्ही पर्वतराजींमध्ये चाचणी करताना दिसली आहे. एमजी मोटर अनेक वेगवेगळ्या भागात नवीन अॅस्टर एसयूव्हीची चाचणी करत आहे. चाचणीदरम्यान या कारची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. कारची समोरची, बाजू आणि मागची बाजू या चित्रांमध्ये दिसू शकते.
काय आहेत वैशिष्ट्ये
कारला एमजी लोगो असलेली कंपनीची सिग्नेचर ग्रिल समोर दिली जाणार असून ग्रिलच्या दोन्ही बाजूला एलईडी हेडलाइट युनिटचा वापर केला जाणार आहे. त्याखाली फॉग लाईट्स ठेवले जातील तसेच बंपरवर धारदार रेषा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्याला एक मजबूत लूक मिळतो. साइड प्रोफाइलबद्दल बोलायचं तर त्यात 5-स्पोक अलॉय व्हील्स देता येतात. याशिवाय इंडिकेटर्स ओआरव्हीएमवर ठेवले जातील. त्याचा टेललाईट आणि एमजी लोगो मागील बाजूस दिसू शकतो. (Each variant of the MG Aster will have a touch-screen feature)
नवी मुंबईत एका दिवसात 100 केंद्रांवर 34112 नागरिकांचे विक्रमी लसीकरणhttps://t.co/T6bPZoTBY9#NaviMumbai |#Corona |#Vaccination |#Record
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
इतर बातम्या
महाविकास आघाडीचा दलितविरोधी चेहरा बार्टीचे अनुदान बंद केल्यामुळे उघड, राजकुमार बडोलेंची टीका