इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात

इव्ही इंडियाची ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 130 किलोमीटरपर्यंत धावते. तसेच ही स्कूटर 70 किमी / प्रति तास इतक्या वेगाने धावू शकते.

इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात
Eeve Soul
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 10:30 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric  Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (EeVe India launches Electric scooter called Soul with 130KM range)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, स्टार्टअप कंपनी EeVe India ने Soul नावाची इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. या स्कूटरला देशात चांगली पसंती मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत, भारतीय बाजारपेठ खूप मोठी होत आहे. यामुळेच वाहन निर्माता कंपन्या एकामागोमाग एक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहेत. या मालिकेत देशातील आघाडीची स्टार्टअप कंपनी ईव्ही इंडियाने (EeVe India) सोल (Soul) नावाची आणखी एक स्कूटर बाजारात सादर केली आहे. यापूर्वी कंपनीने Ahava आणि Atreo या दोन स्कूटर्स लाँच केल्या आहेत. यामध्ये Ahava ची किंमत 55,900 रुपये आणि Atreo ची किंमत 64,900 रुपये इतकी आहे.

Carandbike च्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक स्कूटर Soul साठी EeVe India ला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून मान्यता मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर हाय स्पीड स्कूटर असेल यामध्ये दमदार पॉवरसह चांगली ड्रायव्हिंग रेंज मिळेल.

EeVe Soul सिंगल चार्जमध्ये 130 किमी धावणार

मिळालेल्या अहवालानुसार, इव्ही इंडियाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 130 किलोमीटरपर्यंत धावते. तसेच ही स्कूटर 70 किमी / प्रति तास इतक्या वेगाने धावू शकते. ही स्कूटर तयार करण्यांसाठी कंपनीने सुमारे 45 टक्के लोकल कम्पोनंट्सचा वापर केला आहे. लवकरच कंपनी हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण सहा स्कूटर आहेत, ज्यात Xeniaa, 4U, Wind, Your, Atreo आणि Ahava इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

(EeVe India launches Electric scooter called Soul with 130KM range)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.