Okinawa Scooter | स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लायसन्सचीही गरज लागणार नाही, किंमत फक्त…
ओकिनावा या जपानी कंपनीने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेकने ओकिनावा ड्युअल नावाचे ही स्कूटर बाजारात आणलीय.
नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढते आहे. अनेक विदेशी कंपन्यांनी भारतात आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. ज्यात एकापेक्षा एक खास वैशिष्ट्ये आहेत. अशातच, ओकिनावा या जपानी कंपनीने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेकने ओकिनावा ड्युअल नावाचे ही स्कूटर बाजारात आणलीय. (Electric Scooter Will Launch Will Carry 200 Kg Weight)
ओकिनावा ड्युअल स्वस्त आणि मस्त…
ओकिनावा ड्युअल ही स्कूटर 58,998 रुपये किंमतीत भारतात लॉन्च करण्यात आली. या इलेक्ट्रिक स्कूटरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 200 किलो वजन उचलण्याची वाहून नेण्याची क्षमता आहे. या स्कूटरवरुन तुम्ही जास्त जड सामान आरामात घेऊन जाऊ शकता. ही ई-स्कूटर नवीनत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह भारतीय बाजारात सज्ज आहे.
सर्वाधिक वजन पेलणारी इलेक्ट्रिक स्कूटर…
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओकिनावा ड्युअल ही ऑटो आणि डिलीव्हरी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केली आहे. तसंच, ही स्कूटर लास्ट माईल लॉजिस्टिक सोल्युशन सादर करते. ओकिनावा ड्युअल ही इलेक्ट्रिक स्कूटर आतापर्यंतची सर्वाधिक वजन पेलणारी म्हणून ओळखली जाणार आहे.
गाडीसोबत काय काय अॅक्सेसरीज…?
ओकिनावा ड्युअलबरोबर काही अॅक्सेसरीज फ्री मिळणार आहेत. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉक्स, स्टॅक औषधांसाठी कोल्ड स्टोरेज बॉक्स, सिलिंडर कॅरिअर अशी उपकरणे मिळतील. यामध्ये आपण आपली उत्पादने सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकतो.
स्कूटरचे खास फिचर्स कोणते…?
ओकिनावा ड्युअलमध्ये 250 डब्ल्यू इलेक्ट्रिक मोटर आहे जिचा वेग 25 किमी प्रति तास आहे. कमी वेगामुळे आपल्याला ओकिनावा ड्युअलसाठी नोंदणी आणि चालक परवान्यासारख्या गोष्टींची आवश्यकता नाही. 75 किलोच्या ड्युअलमध्ये पुढच्या चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील चाकावरील ड्रम ब्रेक आहेत. ड्युअल स्कूटरमध्ये 48 डब्ल्यू 55 एएच लिथियम आयन डिटेच करण्यायोग्य बॅटरी आहे जी 1. 5 तासात 80 टक्क्यां सुमारे 4-5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. एकदा चार्ज झाल्यावर बॅटरी 130 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ओकिनावा ऑटोटेक बॅटरीवर-वर्षाची वॉरंटी आणि पॉवरट्रेनवर-वर्षाची किंवा 30 हजार किमी (जे आधी असेल) वॉरंटी देते.
(Okinawa Electric Scooter Will Launch Will Carry 200 Kg Weight)
हे ही वाचा :
2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच
Team India | महिंद्राचा धमाका, टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना भारदस्त THAR-SUV भेट देणार