‘या’ इलेक्ट्रिक ट्रकने रचला गिनीज रेकॉर्ड, रिचार्जविना पार केलं तब्बल 1,099 किमी अंतर
केवळ इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कन्व्हर्ट होणाऱ्या कारच नव्हे तर मर्सिडीज-बेंझ आणि व्होल्वो सारख्या वाहन उत्पादक कंपन्यादेखील पूर्ण इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रक लाँच करण्याची तयारी करीत आहेत.
मुंबई : केवळ इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कन्व्हर्ट होणाऱ्या कारच नव्हे तर मर्सिडीज-बेंझ आणि व्होल्वो सारख्या वाहन उत्पादक कंपन्यादेखील पूर्ण इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रक लाँच करण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये युरोपचे फ्यूचरिकम, एक कमर्शियल व्हीकल ब्रँड समाविष्ट आहे, ज्याने इलेक्ट्रिक ट्रक विकसित आणि उत्पादन करण्यासाठी डीपीडी स्वित्झर्लंड आणि कॉन्टिनेंटल टायर्ससह भागीदारी केली आहे. (electric truck set a Guinness world record, covering distance of 1,099 km without charging)
अशा परिस्थितीत, आता या टीमने अलीकडेच रिचार्ज न करता इलेक्ट्रिक ट्रकने सर्वात लांब अंतर पार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. रेकॉर्डसाठी, भागीदारांनी ई-ट्रकचा वापर केला, जो डिलीव्हरी ट्रॅफिकमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वापरात आहे. सुधारित व्होल्वो युनिट असलेल्या ई-ट्रकने रिचार्ज न करता तब्बल 1,099 किमी अंतर कापले.
कॉन्टिनेंटलच्या इन-हाऊस टेस्ट सेंटर, कॉन्टिड्रोम येथे 2.8 किमी लांब, ओव्हल टेस्ट ट्रॅकवर इलेक्ट्रिक वाहन चालवले. दोन चालकांनी हा ई-ट्रक चालवला आणि 23 तासात 392 लॅप पूर्ण केले. ट्रकची सरासरी गती 50 किमी प्रतितास (31 मैल प्रति तास) इतकी होती, कंपनीने सांगितले आहे की, ही गती दैनंदिन वापरासाठी सरासरी मूल्य आहे.
डीपीडी स्वित्झर्लंडच्या स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशनचे संचालक मार्क फ्रँक म्हणाले की, कंपन्यांनी सुरुवातीच्या टप्प्यावर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ई-ट्रक कोणत्याही अडचणीशिवाय दररोज सुमारे 300 किलोमीटर अंतर कापू शकतो. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही आता आमच्या कामगिरीची पातळी अधिकृतपणे नोंदवू शकलो आहोत.
फ्यूचरिकम ब्रँडच्या मागच्या कंपनी Designwerk Products AG चे मुख्य कार्यकारी अधिकारी एड्रियन मेलिगर यांनी सांगितले की, या इलेक्ट्रिक ट्रकची बॅटरी क्षमता 680 किलोवॅट आहे जी युरोपमधील सर्वात मोठी ट्रक बॅटरी आहे. 19 टन वजनाच्या ट्रकमध्ये 680 एचपी पेक्षा जास्त पॉवर आउटपुट आहे.
इतर बातम्या
Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी
Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली
(electric truck set a Guinness world record, covering distance of 1,099 km without charging)