Electric Vehicle | इलेक्ट्रीक कारबाबत असतात हे पाच प्रमुख गैरसमज, पाहा नेमके सत्य काय ?
इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ आपल्या देशातही वाढत आहे. परंतू ही वाहने खरेदी करताना त्यांच्याबाबत ठराविक गैरसमज आढळतात आता पाहूया या वाहनांबाबत आढळणारे टॉप 5 गैरसमज आणि त्याची खरी उत्तरे
नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबत लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. परंतू इलेक्ट्रीक गाड्या घेताना सर्वांना त्याबाबत अनेक गैरसमज देखील आहेत. तुमच्याही मनात इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबत काही गैरसमज असतील तर या लेखात इलेक्ट्रीक कारबाबत टॉप 5 गैरसमजाबाबतची माहीती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पुढच्यावेळी इलेक्ट्रीक कारबाबत चुकीची माहीती सादर करेल तेव्हा तुम्ही त्याला खरी बाब सांगू शकाल. चला पाहूया नव्या युगाच्या इलेक्ट्रीक कारबाबतचे सर्वाधिक पाच गैरसमज काय ?
1 ) इलेक्ट्रीक वाहनाला अधिक मेन्टेनन्सची गरज
इलेक्ट्रीक वाहनात पारंपारिक वाहनांच्या (ICE) Internal Combustion Engines तुलनेत कमी सक्रीय पार्ट असतात. इलेक्ट्रीक वाहनात बहुतांशी सामान्य पार्टच असतात. जसे टायर, ब्रेक, सस्पेंशन आदी. जे पारंपारिक वाहनांसारखेच असतात. परंतू सक्रीय पार्टची संख्या कमी असते. ज्याचा अर्थ मेटेनन्ससाठी देखील कमी त्रास असणार आहे.
2 ) वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा जादा
पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांची किंमत सुरुवातील जादा वाटते. परंतू रोजचा त्यांच्या इंधन खर्च पाहाता ही किंमत पेट्रोल वाहनांच्या पेक्षा खूपच कमी आहे. तसेच पारंपारिक पेट्रोल वाहनांना काही वर्षांनंतर इंजिन ऑईल, वॉल्व तपासणी, इंजेक्टरची सफाई आणि इतर मेन्टेनन्स गरज असते. तर इलेक्ट्रीक कारमध्ये हा खर्च वाचतो.
3 ) इलेक्ट्रीक वाहने महाग
टेस्ला किंवा बीएमडब्ल्यू सारख्या कंपनीच्या इलेक्ट्रीक कार जरुर महागड्या आहेत. भारतात टाटा नेक्सन, टीयागो, महिंद्र एक्सयूव्ही 400 आणि यासारख्या अनेक इलेक्ट्रीक वाहनांच्या एक बाजारातील आगमनाने दिवसेंदिवस इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती स्वस्त होत आहेत. आता प्रत्येकाच्या बजेट इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध आहे.
4 ) इलेक्ट्रीक वाहनांचा वेग कमी
असा आरोप करण्याआधी तुम्ही स्वत: अनुभव घ्यायला हवा. इलेक्ट्रीक वाहनांची टॉप स्पीड ठीकठाक असतो. एक्सप्रेस हायवेवर सरासरी दरताशी 100 ते 120 किमी वेगाने ही वाहने धावू शकतात.
5 ) चार्जिंगसाठी पुरेसे स्टेशन नाहीत
भारतात अन्य प्रगत देशांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा नाहीत. परंतू बहुतांश महामार्गांवर इलेक्ट्रीक वाहनांसाठी फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत. बॅटरी संपायला काही तास लागतात. तसेच मोबाईल एपवर चार्जिंग स्टेशनचे मॅप दिलेले असतात.