टाटा मोटर्सकडून बेस्टच्या वरळी डेपोचे विद्युतीकरण, इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी मुंबईतला चौथा डेपो सज्ज

टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने वरळी बेस्‍ट डेपो येथे परिपूर्ण व्हेईकल चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या यशस्‍वीरित्‍या इन्‍स्‍टॉलेशनची घोषणा केली.

टाटा मोटर्सकडून बेस्टच्या वरळी डेपोचे विद्युतीकरण, इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी मुंबईतला चौथा डेपो सज्ज
Electric BEST bus
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:25 PM

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने वरळी बेस्‍ट डेपो येथे परिपूर्ण व्हेईकल चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या यशस्‍वीरित्‍या इन्‍स्‍टॉलेशनची घोषणा केली. बॅकबे, मालवणी व शिवाजी नगर डेपोनंतर विद्युतीकरण करण्‍यात आलेला वरळी डेपो हा चौथा बेस्‍ट डेपो असेल. ज्‍यामुळे मुंबई शहरामध्‍ये इलेक्ट्रिक बसेसच्‍या व्‍यापक पोहोच निर्माण होईल. (Electrification of BEST’s Worli depot by Tata Motors, its 4th depot ready to charge electric buses)

टाटा मोटर्स कंपनी निर्धारित वेळेनुसार बेस्‍टला इलेक्ट्रिक बसेस वितरित करत आली आहे. भव्‍य समारोहासह वरळी डेपोचे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र सरकारचे पर्यटन व पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्या ठाकरे, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्‍ट उपक्रम समितीचे अध्‍यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्‍ट उपक्रमाचे महा-व्‍यवस्‍थापक आयएएस लोकेश चंद्रा, तसेच महाराष्‍ट्र सरकार, बेस्‍ट व टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी बोलताना बेस्‍ट उपक्रमाचे महा-व्‍यवस्‍थापक लोकेश चंद्रा म्‍हणाले, ”आम्‍हाला वरळी डेपोमधून इलेक्ट्रिक बसेसच्‍या कार्यसंचालनांचा शुभारंभ करण्‍याचा आनंद होत आहे. मुंबईतील चौथ्‍या डेपोच्या विद्युतीकरणामुळे पर्यावरणास अनुकूल इलेक्ट्रिक बसेसची पोहोच अधिक वाढेल आणि प्रवाशांच्‍या फायद्यासाठी नवीन मार्ग देखील निर्माण होतील. बेस्‍ट नेहमीच आपल्‍या ताफ्याचे विद्युतीकरण करण्‍याशी कटिबद्ध आहे आणि या दिशेने टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.”

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सचे प्रॉडक्‍ट लाइन – बसेसचे उपाध्‍यक्ष रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”आम्‍हाला अद्वितीय ‘वन टाटा’ उपक्रमांतर्गत टाटा पॉवरसोबत सहयोगाने वरळी बेस्‍ट डेपो येथे परिपूर्ण व्हेईकल चार्जिंग पायाभूत सुविधेचे इन्‍स्‍टॉलेशन पूर्ण केल्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे. टाटा मोटर्स पर्यायी इंधनासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे, तसेच भारतामध्‍ये इलेक्ट्रिक बसेसची अग्रणी उत्‍पादक राहिली आहे. आम्‍हाला इलेक्ट्रिक बसेसच्‍या पुरवठ्यासोबत परिपूर्ण चार्जिंग पायाभूत सुविधेची अंमलबजावणी, मेन्‍टेनन्‍स व कार्यसंचालन सुरू करण्‍यासाठी बेस्‍टसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो.”

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Electrification of BEST’s Worli depot by Tata Motors, its 4th depot ready to charge electric buses)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.