अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…

एलन मस्क यांनी (Elon Musk) अवघ्या तीन महिन्यातच आपला Tesla आणि Bitcoin या Cryptocurrency बाबतचा महत्त्वाचा निर्णय बदलला आहे.

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण...
Elon Musk,Tesla, Bitcoin Cryptocurrency
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 7:00 PM

मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्त अशी ओळख असलेल्या एलन मस्क यांनी (Elon Musk) अवघ्या तीन महिन्यातच आपला महत्त्वाचा निर्णय बदलला आहे. मस्क यांनी जाहीर केले आहे की, टेस्ला (Tesla) कंपनी यापुढे बिटकॉइन्समध्ये (Bitcoin) देयके (पेमेंट) स्वीकारणार नाही. (Elon Musk Company Tesla will not accept payments in Bitcoin)

आपल्या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी एलन मस्क यांनी एक ट्विट केले आहे. मस्क यांच्या ट्विटनुसार बिटकॉइन मायनिंग (खनन) आणि ट्रान्झॅक्शनसाठी जीवाश्म इंधनाचा (Fossil fuel – कोळसा, पेट्रोलियम, कच्चे तेल, नैसर्गिक वायू) व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. म्हणून आगामी काही काळात त्यांची कंपनी क्रिप्टोकरन्सीच्या मार्गे कोणतं पेमेंट स्वीकारणार नाही.

मस्क म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीची कल्पना खूपच शानदार आहे आणि त्याचे भविष्यही उज्ज्वल आहे. परंतु त्याचा आपल्या पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होत आहे. ते म्हणाले की टेस्ला यापुढे बिटकॉइन्समध्ये कार विकणार नाही. जेव्हा क्रिप्टोकरन्सी खनन टिकाऊ उर्जेवर (मायनिंग सस्टेनेबल एनर्जी) आधारित होईल, तेव्हा आपण पुन्हा त्या करन्सीचा वापर करु.

टेस्लाकडून .5 अब्ज डॉलर्सचा बिटकॉइन खरेदी

त्याचबरोबर मस्क असेही म्हणाले की, कंपनी अशा क्रिप्टोकरन्सीचा विचार करत आहे, ज्यावर बिटकॉइन मायनिंगमध्ये जितक्या उर्जेचा वापर होतो, त्याच्या किमान 1 टक्क्याहून कमी उर्जेचा वापर होईल. फेब्रुवारी 2021 मध्ये नियामक (रेग्युलेटरी) दाखल करताना टेस्लाने म्हटले होते की, त्यांनी 1.5 अब्ज डॉलर्सचा बिटकॉइन खरेदी केला आहे. याशिवाय त्यांनी बिटकॉइनमध्ये पेमेंट घेण्याबाबतही सांगितले होते.

मस्क यांच्या ट्विटनंतर टेस्लाच्या किंमतीत घट

दरम्यान, मस्क यांच्या ट्विटनंतर टेस्लाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सकाळी 12.15 वाजता, बिटकॉइन 51 हजार 094 डॉलर्स इतक्या पातळीवर व्यापार करीत होता आणि त्यात सुमारे 11 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. याआधी बिटकॉईन आतापर्यंत 64 हजार 829 डॉलर्स इतक्या हाय रेटपर्यंत गेला होता. 2021 मध्ये बिटकॉईनने 75 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

टेस्ला Dogecoin स्वीकारणार?

एलन मस्क यांनी 11 मे रोजी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोल आयोजित केला होता. या पोलमध्ये त्यांनी विचारले होते की, टेस्लाने डॉजकॉईन (Dogecoin) स्वीकारावे की नाही. या सर्वेक्षणात. 78.20 टक्के लोकांनी सांगितले की, कंपनीने डॉजकॉईनमधील देय (पेमेंट) स्वीकारले पाहिजे, तर 21.80 टक्के सहभागींनी सांगितले की, त्यांनी अशा प्रकारचे पेमेंट स्वीकारू नये.

गेल्या काही काळापासून Dogecoin चर्चेत आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत ही पाचव्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी आहे. ही करन्सी सध्या 0.43 डॉलर्स च्या स्तरावर व्यापार करीत आहे. 2021 मध्ये आतापर्यंत या क्रिप्टोकरन्सीने 9228 टक्के परतावा दिला आहे.

संबंधित बातम्या

मास्टरकार्डच्या नेटवर्कवरून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याची संधी

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

Bitcoin मागे पडलं! या भारतीय कंपनीने फक्त 4 महिन्यात 1 लाखाचे केले 68 लाख; वाचा कशी झाली कमाई

(Tesla will not accept payments in Bitcoin, Elon Musk reverses course on accepting crypto for vehicles over climate concerns)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.