Ethanol Fueled Car : एक शंका होती, आमची जुनी कार पण धावेल का हो इथेनॉलवर?

Ethanol Fueled Car : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिली इथेनॉलवर धावणारी कार लाँच केली. त्यानंतर भारतभर या पर्यायी इंधनाविषयी उत्सुकता ताणल्या गेली आहे. सध्याच्या कार मालकांना पण या इंधनावर कार दामटावी असे वाटत आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का?

Ethanol Fueled Car : एक शंका होती, आमची जुनी कार पण धावेल का हो इथेनॉलवर?
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 3:22 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लाँचिंग केले. ही देशातील पहिली इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार (Electrified Flex fuel Car) आहे. म्हणजे इथेनॉलवर ही कार धावेल. धावता धावता ती ऊर्जा तयार करेल. ती बॅटरीत साठवल्या जाईल. या इलेक्ट्रिक ऊर्जेवर पण तुमची कार धावेल. म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असा हा मामला आहे. या इंधन प्रयोगामुळे देशात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी सर्वसामान्य हैराण झाला आहे. त्यात काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. पण या किंमती अजूनही गगनालाच भिडलेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेललाच पर्याय देण्याचा खास प्रयत्न करत आहे. आता इथेनॉलवर चारचाकी दामटावी असे अनेकांचे स्वप्न आहे. पण जुनी चारचाकी इथेनॉलवर(Ethanol) खरंच धावेल काय? त्यासाठी या कारमध्ये काय बदल करावे लागतील बरं?

कोणती कार धावेल इथेनॉलवर

तर इथेनॉलवर केवळ पेट्रोल कार धावेल. या इंधनावर डिझेल कार चालत नाही. कारण डिझेल कारचे इंजिन पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे डिझेल कार इथेनॉल इंधनावर सध्या चालवता येऊ शकत नाही. पेट्रोल कार इथेनॉलवर चालविल्या जाऊ शकते. पण त्यामध्ये एक अडचण आहे.

हे सुद्धा वाचा

जुनी पेट्रोल कार कशी दामटणार

जुन्या पेट्रोल कारला इथेनॉलवर धावण्याविषयी केंद्र सरकारने अजूनही कोणतेही म्हणणे मांडलेले नाही. सामान्य कारच्या इंधन टाकीत 20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल टाकता येत नाही. जुनी कार इथेनॉलवर दामटण्यासाठी कोणतेही साधन, किट, फिल्टर अजूनही बाजारात आलेले नाही. त्यामुळे जुनी कारमध्ये लागलीच इथेनॉल टाकणे नुकसानदायक ठरु शकते. त्यामुळे कारचे इंजिन आणि इतर पार्टसचे मोठे नुकसान होऊ शकते.

सध्या काय स्थिती

सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळवण्यात येते. त्यामुळे कारची क्षमता वाढलीच आहे. पण प्रदुषणही कमी झाले आहे. ब्राझीलनंतर अमेरिकेत इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील कार उत्पादक कंपन्यांनी इथेनॉल बेस्ट कारच्या उत्पादनावर भर दिला आहे. पण भारतात अजूनही याविषयीचे कोणतेही धोरण जाहीर करण्यात आलेले नाही.

खर्च तरी किती येईल

इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे. यामुळे कारचे मायलेज सुधारते. इथेनॉल सध्या प्रति लिटर किंमत 45 ते 50 रुपया दरम्यान असू शकते. ही किंमत पेट्रोलच्या किंमतीपेक्षा कमी आहे. मायलेजचा विचार करता, पेट्रोलवर साधारणपणे 20 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज मिळते. तर इथेनॉलवर कारची कामगिरी सुधारते. इथेनॉलवर 22 ते 25 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज मिळते. पण इंजिन पॉवरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.

Non Stop LIVE Update
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.