Fact Check: पावसात गाडी बुडल्यास इन्श्युरन्स क्लेम मिळणार का?, जाणून घ्या…

अशातच पाण्यात बुडालेल्या गाडीचा विमा संरक्षण मिळणार का? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला कोणत्या परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार हे सांगणार आहोत.

Fact Check: पावसात गाडी बुडल्यास इन्श्युरन्स क्लेम मिळणार का?, जाणून घ्या...
car drown
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 2:28 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झालीय. विशेषतः कोकणातील चिपळूण शहर पूर्णतः पाण्याखाली गेले होते. अनेकांच्या बऱ्याच वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर गाड्यासुद्धा वाहून गेल्याचं चित्र समोर आलं. अनेक गाड्या एकमेकांवर आदळलेल्याही पाहायला मिळाल्या. अगदी ‘सेफ पार्किंग लॉट’ , ‘ओपन गॅरेज’ किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अशातच पाण्यात बुडालेल्या गाडीचा विमा संरक्षण मिळणार का? हा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. तर आम्ही तुम्हाला कोणत्या परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार हे सांगणार आहोत.

?काँप्रेहेन्सिव्ह रिस्क कव्हर इन्शुरन्स कंपनीकडून घेणे आवश्यक

नव्या घेतलेल्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे ‘काँप्रेहेन्सिव्ह रिस्क कव्हर’ (Comprehensive Cover) इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेले असले पाहिजे. जर कर्ज घेऊन गाडी घेतली असेल तर गाडीचा विमा ”काँप्रेहेन्सिव्ह’ असेलच याची खात्री करून घ्या, कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते. तसे न केल्यास गाडीचा हप्तासुद्धा भरावा लागू शकतो आणि गाडी दुरुस्त पण स्वतःच्या पैशातून करावी लागेल.

? …तर गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी देणार नाही

काही वाहन मालक 1-2 वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (Premium) कमी भरायच्या हेतूने फक्त ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ काढतात. असे केलेले असल्यास पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देणार नाही. तुमच्या गाडीचा विमा सर्वसमावेशक म्हणजेच 1st Party (Comprehensive) असला पाहिजे. जर तो 1st Party असल्यास आधी एक महत्त्वाचे काम करा. गाडी जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तात्काळ तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाईनवर फोन करून तुमचे नाव , पॉलिसी नंबर आणि गाडीचे लोकेशन पाठवा. कंपनीकडून सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टोईंग करून गॅरेजला पाठवा आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात दुरुस्त करता येईल.

? पाण्यात बुडालेली गाडी सुरू करणे धोक्याचे

आता या सगळ्यात एक मोठी चूक तुम्ही करण्याची शक्यता असते. ती म्हणजे सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्निशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे. खरं तर असे करणे म्हणजे मोठा तोटा आहे. कारण जर तुम्ही असे केलेत तर गाडीचे इंजिन ‘हायड्रोलॉक’ होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरू होताना इंजिनमध्ये पाणी घुसेल आणि इंजिनमध्ये ‘बिघाड’ होईल. इंजिनमध्ये ‘बिघाड’ झाल्यास ते कामातून जाईल.

? तर विमा संरक्षण मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेल्या नुकसानात मोडणार

इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजिनचे नुकसान ‘कॉन्सिक्वेंशिअल लॉस’ म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे ‘मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान’ या प्रकारात मोडणार आहे. परिणामी तुम्हाला इंजिनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही. एकूण नुकसानीत इंजिन हाच मोठा खर्च असतो, तोच मिळाला नाही तर इतर नुकसानभरपाई मिळूनही काहीच फायदा नाही. जर ‘अ‍ॅड ऑन ‘ म्हणून इंजिनचा स्वतंत्र विमा (Engine Cover) त्याच पॉलिसीत घेतला असेल तर ही ‘कॉन्सिक्वेंशिअल लॉस ‘ अट लागू पडत नाही.

?या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या…

? पाण्यात बुडलेली गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू नका

? इंजिनचा स्वतंत्र विमा (Engine Cover) त्याच पॉलिसीत घेतला असेल तर ही ‘कॉन्सिक्वेंशिअल लॉस ‘ अट लागू नाही

? हायड्रोलॉकिंगचा धोका असलेल्या गाड्यांना इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही

? थोडक्यात गाडी कितीही पाण्यात बुडाली आणि तुम्ही चुकून स्टार्ट करू नका

संबंधित बातम्या

PHOTO | एका वर्षाच्या आत भारतात बंद झाल्या या 12 कार, गेल्या सात महिन्यांत विक्री बंद पडली!

रेंजच्या बाबतीत या इलेक्ट्रिक सायकलसमोर स्कूटरही ठरतात अपयशी, सिंगल चार्जमध्ये 72 किमीपर्यंत धावते

Fact Check: Will there be an insurance claim if the car sinks in the rain ?, find out

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.