Car On Road Price : दसऱ्याला नवीन गाडी विकत घ्यायचीय, या ट्रिक वापरुन कमी करा ऑन-रोड किंमत

Car On Road Price : फेस्टिव सीजनमध्ये नवीन कार विकत घेण्याआधी तुम्ही तुमच्या गाडीची ऑन-रोड किंमत कशी कमी करु शकता, ते जाणून घ्या. कामी येणाऱ्या या ट्रिक्स फॉलो केल्या, तर गाडीच्या ऑन रोड प्राइसमधील तफावत तुमच्या लक्षात येईल.

Car On Road Price : दसऱ्याला नवीन गाडी विकत घ्यायचीय, या ट्रिक वापरुन कमी करा ऑन-रोड किंमत
Car Buying TipsImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 1:42 PM

फेस्टिव सीजनमध्ये नवीन गाडी विकत घेण्याचा प्लान करताय? मग, नवीन गाडी विकत घेण्याआधी तुम्हाला या गोष्टीची माहिती असली पाहिजे. म्हणजे नवीन गाडी विकत घेताना तुम्ही कशा प्रकारे Car On Road Price कमी करु शकता. गाडीची एक्स-शोरूम किंमत चुकवून काम चालणार नाही. कारण गाडीची फायनल ऑन-रोड किंमत महत्त्वाची असते. Car Showroom मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कार पसंत पडते. त्या कारची प्राइस लिस्ट दिली जाते. ही प्राइस लिस्ट तुम्ही नीट तपासली तर तुमच्या लक्षात येईल की एक्स-शोरुमशिवाय अशा अनेक गोष्टी दिसतील, ज्याची कदाचित तुम्हाला गरज नसेल. पण तरीही या गोष्टी प्राइस लिस्टमध्ये असतील. त्यामुळे कारची ऑन-रोड किंमत वाढते. आज आम्ही तुम्हाला ऑन-रोड किंमत कशी कमी करायची, त्या बद्दल सांगणार आहोत.

तुम्हाला शो रुममधून Car Insurance घ्यायचा नसेल, तर तो तुमचा निर्णय असला पाहिजे. अनेकदा लोक शो रुममधून कार इंश्योरेंस घेण्याऐवजी बाहेरुन इंश्योरेंस विकत घेतात. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, लोक असं का करतात? शो रुम ऐवजी बाहेरुन इंश्योरेंस घेणं जास्त स्वस्त पडतं. तुम्ही नवीन कार घेताना ही गोष्ट करुन पाहा. इंश्योरेंस शोरुम मधून घ्यायचा की बाहेरुन हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. शो रुम आणि बाहेरुन इंश्योरेंस करणं यातील फरक स्पष्टपणे दिसून येईल. शो रुममधून नवीन कार त्याचवेळी बाहेर येईल, जेव्हा तुम्ही डिलीवरी घेताना इंश्योरेंस कॉपी दाखवाल.

तुम्ही या दोन गोष्टी करुन बघा

इंश्योरेंस शिवाय तुम्हाला कारची एक्सटेंडेड वॉरंटी नको असेल, तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता. कारण एक्सटेंडेड वॉरंटी घ्यायची किंवा नाही हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही या दोन गोष्टी करुन बघा, तुमच्या कारची ऑन-रोड किंमत पहिल्यापेक्षा कमी झालेली असेल.

Car Buying Tips : दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

कार लोनवर घेताना वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपनीच्या व्याज दराची तुलना करा. अनेकदा एखादी कंपनी जास्त व्याजदर आकारते तर दुसरी कमी व्याज आकारते.

अनेकदा काही डिलर्स फेस्टिव सीजनमध्ये डिस्काऊंट आणि शानदार ऑफर्स देतात. योग्यवेळी कार विकत घेऊन तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. अशा प्रकारे नवीन कार विकत घेताना तुम्ही किंमत कमी करु शकता.

गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.