Maruti Suzuki Alto K10 खरेदी करण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…
मारुती सुझुकी अल्टो K10 च्या एंट्रीमुळे भारतातील लहान कारच्या मार्केटला आता नवीन बूस्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. अनेक जण आपल्या गरजेनुसार छोट्या कारलाच पसंती देत असतात. तुम्हीही अशाच एखाद्या लहान कारच्या शोधात असाल तर नवीन Alto K10 हा एक चांगला पर्याय आहे.
भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) अल्टोचे थर्ड जनरेशन मॉडेल (Alto K10) बाजारात आणले आहे. अल्टोच्या नवीन मॉडेलने K10 सब-ब्रँडसह मार्केटमध्ये एंट्री केली आहे. मारुती अल्टो K10 दोन वर्षांपूर्वी B6 उत्सर्जन नियमांमुळे बंद करण्यात आली होती. नुकतीच लाँच झालेली मारुती सुझुकी अल्टो K10 पूर्वीपेक्षा काहीशी मोठी आहे. भारतीय ग्राहकांना त्यात अगदी नवीन एक्सटीरियर आणि इंटीरियर कंसेप्ट बघायला मिळणार आहे. नवीन K10C पेट्रोल इंजिनमध्ये अनेक आकर्षक फीचर्सदेखील (Features) देण्यात आली आहेत. तुम्ही एंट्री लेव्हल कार खरेदीदार असाल आणि तुम्ही अल्टो के10 ची निवड केली असेल तर, पुढील पाच गोष्टी तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहेत.
- अल्टो के10 च्या बेस व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. तर दुसरीकडे त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्सशोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. याचा अर्थ असा की नवीन अल्टोची किंमत Alto 800 पेक्षा 60,000 रुपये अधिक आहे. अल्टो K10 मारुती एस-प्रेसो पेक्षा 25,000 रुपये स्वस्त आहे.
- मारुती अल्टो के10 चे डिझाईन पूर्वीपेक्षा जास्त राउंड शेप आहे. त्यामुळे त्याचा लूक मारुती सेलेरियोसारखा आहे. अल्टो के10 ला हबकॅप्ससह 13 इंच स्टील व्हील मिळतात. त्यासोबतच एक मोठी ग्रिल मिळते आणि अल्टो के10 चा मागील भाग सेलेरियोशी थोडासा मेळ खातो.
- नवीन अल्टोमध्ये सेलेरियो आणि एस-प्रेसो सारखी 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आली आहे. अल्टो के10 च्या स्क्रीनच्या बाजूला सिल्व्हर एक्सेंट देखील देण्यात आला आहे. याला सेलेरियो आणि एस-प्रेसोप्रमाणे स्क्रीनच्या तळाशी फ्रंट पॉवर विंडो बटण देखील मिळते. अँपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
- अल्टोचे नवे मॉडेल हे तिसऱ्या व्हेरिएंटचे मॉडेल आहे. यात 67hp, 1 लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सेलेरियो आणि एस-प्रेसोमध्ये देखील वापरले जाते. अल्टो के10 मध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी ऑटोमॅटिक आहे.
- भारतीय बाजारपेठेत, अल्टो के10 थेट रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करते. दरम्यान, अल्टो के10 चे खरेदीदार अल्टो 800 आणि एस-प्रेसोचा देखील विचार करु शकतात. अल्टो के10 च्या किमती पाहता, मारुती सुझुकीच्या लाइनअपमधील इतर कारचाही विचार केला जाऊ शकतो.