Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) विकासाबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) विकासाबाबत मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग स्टेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सीतारमण यांनी आपल्या भाषणात सांगितले. सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल. सीतारमण म्हणाल्या की, आगामी काळात सरकार बॅटरी स्वॅपिंग धोरण आणणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्पेशल मोबिलिटी झोन तयार केले जातील. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जाणार आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी जलविद्युत आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 1400 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर वीज क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी पॉवरचे शेअर्स 2.70 टक्के आणि टाटा पॉवरचे शेअर्स 2.30 टक्क्यांनी वधारत आहेत.
सरकारने 2030 पर्यंत 280 GW (गीगावॉट) सौर ऊर्जा उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पीएलआय योजनेंतर्गत अर्थसंकल्पात अतिरिक्त 19,500 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर सोलर मॉड्युल तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
To facilitate domestic manufacturing for ambitious goal of 280 GW of installed solar capacity by 2030, addl allocation of Rs 19,500 cr for PLI for manufacturing of high-efficiency modules with priority to fully integrate manufacturing units to solar PV modules will be made: FM pic.twitter.com/aVWE30hAZF
— ANI (@ANI) February 1, 2022
इतर बातम्या
Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?
नवीन SUV खरेदी करताय? पाहा टाटा, मारुती, ह्युंडईचे एकापेक्षा एक पर्याय, किंमत 5.64 लाखांपासून