Mahindra Thar ला टक्कर देणारी Force Gurkha SUV महागली, जाणून घ्या नवीन किंमत

फोर्स मोटर्सने जानेवारीपासून त्यांच्या 4X4 ऑफ-रोड SUV गुरखाच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Force Gurkha SUV ची सुरुवातीची किंमत बदलून 14.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे.

| Updated on: Jan 08, 2022 | 5:13 PM
फोर्स मोटर्सने जानेवारीपासून त्यांच्या 4X4 ऑफ-रोड SUV गुरखाच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Force Gurkha SUV ची सुरुवातीची किंमत बदलून 14.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे. एसयूव्ही लाँच करताना सादर केलेल्या किंमतीत कंपनीने यावेळी 51 हजार रुपये वाढवले आहेत.

1 / 6
Force Motors ने 27 सप्टेंबर रोजी ऑफ-रोड SUV लाँच केली होती, त्यावेळी या एसयूव्हीची किंमत 13.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली होती. नवीन जनरेशन गुरखा ही कार महिंद्रा थार एसयूव्हीला टक्कर देता यावी यासाठी अपग्रेड केली आहे. कंपनीने यात डिझाईन अपडेट केलं आहे, तसेच टेक्निकली कार अपग्रेड केली आहे.

2 / 6
फोर्स गुरखा एसयूव्ही, जी आता तिच्या दुसऱ्या जनरेशनमध्ये आहे, तिच्या मागील मॉडेलच्या तुलनेत या कारला नवीन फेसलिफ्ट प्राप्त झाले आहे. नवीन गुरखा आता अधिक आरामदायक लाईफस्टाईल वाहन बनले आहे ज्यात अनेक क्रिएचर कम्फर्ट आणि लेटेस्ट फीचर्स आहेत.

3 / 6
नवीन जनरेशन फोर्स गुरखा एसयूव्हीला सुधारीत बीएस 6 कम्प्लायंट 2.6-लीटर डिझेल इंजिन मिळते जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तथापि, फोर्स मोटर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह कोणतेही व्हेरियंट ऑफर करणार नाही. कार निर्मात्या कंपनीला असा विश्वास आहे की, ‘ज्यांना ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा आहे, ते मॅन्युअल ट्रान्समिशन पसंत करतील’. 2021 गुरखा AWD पर्यायासह ऑफर केली जाईल. फोर्सने डबल विशबोन आणि कॉइल स्प्रिंग्ससह सस्पेंशन सेटअप देखील बदलले आहे.

4 / 6
फोर्स मोटरने 2021 गुरखा एसयूव्हीची स्टाइल बाहेरून आणि आतून अनेक बदलांसह अपग्रेड केली आहे. एसयूव्ही आता नवीन फ्रंट ग्रिलसह बोल्ड लुकला सपोर्ट करते. ही एसयूव्ही सर्क्युलर बाय-एलईडी हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएलसह सुसज्ज आहे. यात 16 इंचांचे अलॉय व्हील्स आहेत. यात एक स्नॉर्कल देखील मिळते जे 700 मिमीच्या वॉटर-वेडिंग क्षमतेसह गुरखाला सपोर्ट करते. मागील बाजूस टेललाइट्सचा नवीन संच तसेच रूफ-माउंटेड लगेज कॅरियरपर्यंत पोहोचण्यासाठी एक शिडीदेखील देण्यात आली आहे.

5 / 6
यात सर्वोत्कृष्ट केबिन मिळेल ज्याला संपूर्ण ब्लॅक इंटीरियर आहे. एसयूव्हीच्या बाह्य क्षमतेसाठी विशेष डिझाइन केलेले फ्लोअर मॅट्स आहेत. याशिवाय, या कारमध्ये सात इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन देखील मिळते जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेला सपोर्ट करते. ड्रायव्हर डिस्प्ले आता सेमी डिजिटल आहे आणि नवीन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या मागे आहे. तर मागील सीटवरील प्रवाशांसाठी मोठी पॅनोरामिक विंडो उपलब्ध आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.