AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Scooter | खुशखबर! पेट्रोल स्कूटरच्या भावात खरेदी करा ई-स्कूटर

E-Scooter | मागील वर्ष वाहन उद्योगासाठी चढ-उताराचे राहिले. तर आता ई-स्कूटर कंपन्या बाजारापेक्षा उलट धावत आहेत. ईव्हीच्या किंमती सातत्याने कमी होत आहे. या क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांनी ई-स्कूटरचे भाव कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल स्कूटरच्या भावात ई-स्कूटर खरेदीची संधी मिळत आहे.

E-Scooter | खुशखबर! पेट्रोल स्कूटरच्या भावात खरेदी करा ई-स्कूटर
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 2:12 PM

नवी दिल्ली | 3 February 2024 : इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. त्यामुळे पेट्रोल स्कूटरच्या भावात त्यांना ई-स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारने फेम-2 सबसिडी कमी केली होती. त्यामुळे ई-स्कूटरच्या किंमती भडकतील असा दावा करण्यात येत होता. सबसिडी कमी करुन पण ई-स्कूटर कंपन्यांच्या किंमतीत सातत्याने कपात होत आहे. आता बाजारात उपलब्ध चांगल्या रेंजची ई-स्कूटरच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत.

ओलाचा भाव इतका झाला कमी

सबसिडी कमी झाली तरी ई-स्कूटरचा भाव कमी झाला आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे. ओला एस1 एक्सचे बेसिक व्हेरिएंट पण याच किंमतीला मिळणार आहे. ओलाने S1X चे एक 4kWh बॅटरी असणारे व्हेरिएंट 109,999 रुपयांना तर 110 सीसी इंजिन पेट्रोल स्कूटरची किंमत 80 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे.

हे सुद्धा वाचा

एथरने केली किंमत कमी

इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी एथर एनर्जी पण या स्पर्धेत उतरली आहे. ही देशातील इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांमध्ये ही लोकप्रिय आहे. ओला कंपनीने किंमत कपातीचे धोरण जाहीर करताच एथर कंपनीने पण ई-स्कूटरच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत या स्कूटरची किंमत राज्यातील सबसिडीनंतर एक लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे.

कंपन्यांचे धोरण तरी काय

इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये सध्याच्या मॉडल्सच्या किंमती कमी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. कंपन्या नवीन किफायतशीर व्हेरिएंट्स घेऊन येत आहे. बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या किंमतीत पण घसरण झाली आहे. काही राज्यात ही स्कूटर अवघ्या 1.15 लाख रुपये आहे. पूर्वी ही स्कूटर दीड लाख रुपयांना मिळत होती. हिरो मोटोकॉर्पने पण इलेक्ट्रिक स्कूटर विदाच्या किंमतीत कपात केली आहे.

शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.