Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bike Insurance : झटपट मिळवा दुचाकी विमा, अवघ्या 2 मिनिटात Policy Active

Bike Insurance : आता विमा कसा काढायचा, विमा कंपनीच्या कार्यालयात कशाला चकरा मारायच्या ही चिंता करायची गरज उरली नाही. तुम्हाला अवघ्या दोन मिनिटांमध्ये विमा काढून मिळेल. त्यासाठी इकडे-तिकडे भटकण्याची तर अजिबात गरज नाही. मोबाईलमधील या प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला झटपट विमा काढता येईल.

Bike Insurance : झटपट मिळवा दुचाकी विमा, अवघ्या 2 मिनिटात Policy Active
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 5:54 PM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : दुचाकीसाठी विमा (Instant Bike Insurance) खरेदी करणं आता कोणतेही दिव्य राहिलेले नाही. अगदी झटपट, अवघ्या दोन मिनिटांत तुम्हाला विमा काढता येईल. आवश्यक माहिती अपडेट केली, पेमेंट केले की तुमच्या ईमेलसह व्हॉट्सअपवर बिलाची पावती आणि विम्याची प्रत ऑनलाईन येईल. इतकी ही प्रक्रिया सोपी आहे. आता दुचाकी अथवा चारचाकीच्या विम्यासाठी कंपन्यांच्या अथवा शो-रुमच्या चकरा मारायचा जमना गेला. तुमच्याकडील स्मार्टफोनवरुन (Smart Phone) सहज विमा काढता येईल. मोबाईलमधील हा प्लॅटफॉर्म तुमच्या मदतीला धावेल. झटपट विमा काढता येईल.

हे ॲप येईल मदतीला

बाईकवरुन जाता जाता तुमच्या लक्षात आलं की बाईकचा विमा संपला आहे, विमा खरेदी करायचा आहे, तर बाईक रस्त्याच्या बाजूला उभी करा. मोबाईलमधील पेटीएम हे ॲप उघडा. तुम्ही विमा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा. योग्य तपशील जमा करा. झटपट विमा मिळवा. कंपनीने काही अडचण आल्यास 24X7 अशी हेल्पलाईन तैनात ठेवलेली आहे. अडचण आल्यास त्रास होणार नाही.

हे सुद्धा वाचा

Paytm बाईक विमा

  1. पेटीएमचा दुचाकी विमा खरेदीसाठी All Services हा पर्याय निवडा.
  2. या ठिकाणी सर्वात खाली या. यामध्ये इन्शुरन्स हा पर्याय दिसेल.
  3. यामध्ये बाईक इन्शुरन्स हा पर्याय निवडा.
  4. वेगवेगळ्या कंपन्यांच्या विमा पॉलिसी समोर दिसतील.
  5. कंपन्याच्या अटी व शर्ती, संरक्षण रक्कम इतर माहिती तपासता येईल.
  6. अगोदरच विमा घेतला असेल तर त्याची माहिती आणि कालावधी तपासता येईल.
  7. पेटीएम विमा कंपन्यांच्या मदतीने दुचाकी विमा पॉलिसी विक्री करते. त्यात ऑफर पण मिळते.

असे करा अप्लाई

  1. सर्वात अगोदर पेटीएम ॲप उघडा
  2. त्यानंतर क्विक सर्व्हिसेवर क्लिक करा
  3. विमा पर्यायमध्ये दुचाकी विम्याचा पर्याय निवडा
  4. तुमच्या दुचाकीचा क्रमांक टाका
  5. बाईक इन्शुरन्स प्लॅन निवडा. खरेदीसाठी क्लिक करा.
  6. दुचाकी मालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, वारसाचे नाव ही माहिती भरा.
  7. पेमेंट केल्यानंतर लागलीच विमा पॉलिसीची इंत्यभूत माहिती ईमेल आणि व्हॉट्सअपवर मिळेल.
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.