Second Hand Scooter : 30 हजारांहून कमी किमतीत मिळवा होंडा ॲक्टिव्हासह ‘या’ चार स्कूटर… जाणून घ्या ऑफर
आज आपण तीस हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्कूटरची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
मुंबई : आपल्याला कुठलीही वस्तू ही स्वस्त व वाजवी दरात मिळावी, अशी प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक इच्छा असतेच. त्यामुळे एखादी वस्तू कुठे स्वस्तात मिळेल या संधीच्या शोधात व्यक्ती असतो. त्यातच जर ती वस्तू दुचाकी सेगमेंटमध्ये असेल तर, व्यक्ती अधिकच चौकस राहून विविध ऑफरच्या शोधात असतो. कदाचित याच मुळे दुचाकीच्या मार्केटमध्ये सेकंड हॅंड (second hand) दुचाकींना मोठी मागणी वाढताना दिसून येत आहे. जर तुम्हीदेखील सत्तर हजार रुपयांची स्कूटर (scooter) केवळ तीस हजारात विकत घेण्याच्या विचारात असाल तर हा लेख आवर्जून वाचा. यात देण्यात आलेल्या डीलनुसार तुम्ही होंडा ॲक्टिव्हासह इतर पाच स्पेशल स्कूरटची वाजवी दरात खरेदी करु शकणार आहात. आज आपण तीस हजारांपेक्षा स्वस्त किंमत असलेल्या स्कूटरची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. यात, होंडा ॲक्टिव्हा, (Activa) यामाहा, फॅसिनो डार्कनाइट एडिशनचादेखील समावेश करण्यात आलेला आहे.
वीस हजार रुपयांत होंडा ॲक्टिव्हा
दिल्लीमध्ये रजिस्टर्ड होंडा ॲक्टिव्हा स्कूटर केवळ वीस हजार रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. हे 2012 चे मॉडेल आहे. ही स्कूटर आतापर्यंत केवळ २३ हजार किमी चालली आहे. ही एक फस्ट ऑनर स्कूटर आहे. यात, 109 सीसीचे इंजीन आणि ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत. यात, एबीएसची सिस्टीम नाही आहे. वरील सर्व माहिती बाइक देखो नावाच्या एका वेबसाइटवर लिस्टेड आहे.
30 हजार रुपयांमध्ये हिरो मैस्ट्रो
होंडा ॲक्टिव्हा नंतर आता हिरो मैस्ट्रो स्कूटरदेखील आएलएक्सवर खरेदी करु शकतात. ही ब्लॅक ॲंड रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 30 हजार रुपये देण्यात आली आहे. हे 2016चे मॉडेल असून दिल्लीमध्ये रजिस्टर्ड करण्यात आलेले आहे. ही स्कूटर फस्ट ऑनर असून आतापर्यंत 28 हजार किमीपर्यंत चालली आहे.
यामाहा फॅसिनो डार्कनाइट एडिशन
यामाहा फॅसिनो डार्कनाइट एडिशन एडिशन ही स्कूटर बाइक देखो नावाच्या एका वेबसाइटवर लिस्टेड आहे. याची किंमत 25 हजार रुपये लावण्यात आली आहे. हे 2015 चे मॉडेल असून आतापर्यंत 13 हजार किमीपर्यंत चालली आहे. ती सेकंड ऑनर स्कूटर आहे. यात 113 सीसीचे इंजीन देण्यात आले असून ते ७.२ बीएचपीची पावर आणि 8.1 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करु शकते.
सुझुकी ॲक्सेस
सुझुकी ॲक्सेस 125 सीसी या स्कूटरची किंमत 24 हजार ठेवण्यात आली असून हे 2015 चे मॉडेल आहे. यात 125 सीसीचे इंजीन देण्यात आलेले आहे. ही स्कूटर आतापर्यंत 22 हजार किमीपर्यंत चालली आहे. डूमवर लिस्टेड माहितीनुसार, ही स्कूटर 45 हजार किमीपर्यंत प्रतीलिटरपर्यंत मायलेज देते.