महा Discount, मारुती सुझुकीच्या वेगवेगळ्या कार्सवर भरघोस ऑफर, कार खरेदीची हीच वेळ

मारुती सुझुकी अल्टो, सेलेरियो, स्विफ्ट, वेगनआर आणि एस-प्रेसो हॅचबॅक कारशिवाय डिझायर सेडान आणि ब्रेझा एसयुव्हीवरदेखील ही ऑफर लागू करण्यात आली आहे.

महा Discount, मारुती सुझुकीच्या वेगवेगळ्या कार्सवर भरघोस ऑफर, कार खरेदीची हीच वेळ
मारुती सुझुकीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 1:44 PM

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) जून 2022 साठी आपल्या विविध मॉडेल्सवर 46 हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. युजर्स कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या (Corporate discount) माध्यमातून भरघोस ऑफर्सचा फायदा घेउ शकणार आहात. मारुती सुझुकी अल्टो, सेलेरियो, स्विफ्ट, वेगनआर (WagonR) आणि एस-प्रेसो हॅचबॅक कारशिवाय डिझायर सेडान आणि ब्रेझा एसयुव्हीवरदेखील ही ऑफर लागू करण्यात आली आहे. दरम्यान, युजर्सना अर्टिगा आणि सीएनजी मॉडल्सच्या खरेदीवर कुठलीही सुट मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांना सर्वाधिक सुट सेलेरियो आणि वेगनआर या दोन कार्सवर मिळणार आहे. तर सर्वाधिक कमी सूट एस-प्रेसोवर मिळणार आहे. या लेखातून जाणून घेउया कोणत्या कार्सवर किती सुट आहे…

सेलेरियो

कंपनीने सेकंड जनरेशन मारुती सुझुकी सेलेरियोला मागील वर्षी बाजारात आणले होते. ही हॅचबॅक कार 67 एचपी, 1.0 लीटर इंजिन आणि 5 स्पीड मॅन्यूअल किंवा एएमटी गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. कंपनीने सेलेरियोचे दोन्ही मॉडर्ल्सवर ग्राहकांना 46000 रुपयांचे डिस्काउंट दिले आहे.

वेगनआर

वेगनआर दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. युजर्सला यात 1.0 आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. दोन्हीही मॅन्यूअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्यायासह उपलब्ध आहेत. युजर्सला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन व्हेरिएंटवर 46000 आणि 1.2 लीटर पेट्रोल व्हेरिएंटवर 20000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

स्विफ्ट

मारुती सुझुकी स्विफ्ट ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ही कार 90 एचपी, 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. युजर्सना यात 5 स्पीड मॅन्यूअल किंवा एएमटी गिअरबॉक्स मिळतात. या व्हेरिएंटवर तुम्हाला 32 हजार रुपयांपर्यंची सूट मिळू शकते.

अल्टो

मारुतीची अल्टो ही आजदेखील देशात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ही कार बजेटमध्ये व कमी मेंटेनन्स असल्याने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, या कारच्या खरेदीवर तुम्हाला 31 हजार रुपयांपर्यंची सूट मिळू शकते.

इको

मारुती सुझुकी इको कंपनीची एक बजेट एमपीव्ही आहे. गाहकांना यात 1.2 लीटरचे इंजिन आणि 5 आणि 7 सीटर तसेच कार्गो व्हेरिएंट मिळू शकते. इका गाडी खरेदी करणार्या ग्राहकांना कंपनीकडून 24 हजार रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय मारुतीच्या डिझायर सेडान, विटारा ब्रेझार एसयुव्ही आणि एस-प्रेसो हॅचबॅक कारच्या खरेदीवरही मोठे डिस्काउंट मिळणार आहे. डिझायर आणि ब्रेझावर 22 हजार तर एस प्रेसोवर 16 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.