सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर जनरल मोटर्सने (General Motors) हमर इलेक्ट्रिक एसयूव्हीवरील (Hummer Electric SUV) पडदा हटवला आहे.

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ
Hummer EV
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 7:22 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्सनेदेखील त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली आहे. (GMC unveils 2024 Hummer EV, an electric off-road SUV with a range of 563 kms)

बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर जनरल मोटर्सने (General Motors) हमर इलेक्ट्रिक एसयूव्हीवरील (Hummer Electric SUV) पडदा हटवला आहे. General Motors Company चा दावा आहे की, हमर ईव्ही ही “सर्वात सक्षम आणि आकर्षक इलेक्ट्रिक सुपरट्रॅक” आहे. हमर ईव्हीच्या घोषणेनंतर या कारचे फॅन्स खूप उत्साही झाले आहेत, परंतु कार घेण्यासाठी त्यांना अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते. कार उत्पादक कंपनीच्या मते, नवीन हमर ईव्ही 2023 पूर्वी शोरूममध्ये दाखाल होण्याची शक्यता नाही.

जीएमसी ग्लोबलचे उपाध्यक्ष डंकन अलड्रेड म्हणाले की, नवीन हमर ईव्ही पुढच्या चॅप्टरप्रमाणे आहे, ज्यामुळे ग्राहक हा ट्रक त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करु शकतील. विशेष म्हणजे या ट्रकचं डिझाईन आकर्षक आहे, जे लोकांना खूप आवडेल.

Hummer EV चे फीचर्स

या एसयूव्हीमध्ये समोरच्या बाजूला नवीन बोल्ड ग्रिल आहे ज्यामुळे ही एसयूव्ही अधिक आकर्षक बनते. तसेच या एसयूव्हीचं इंटीरियरदेखील जबरदस्त आहे. याच्या डॅशबोर्डमध्ये मोठी इन्फोटेनमेंट टच स्क्रीन दिली आहे, जी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. यात एक इन्फिनिटी रूफ डिझाइन देखील आहे जे रिमूवेबल रूफ पॅनेलसह येते. यात पॉवर विंडोज आहेत माऊंटिंग फ्रेम्सदेखील दिल्या आहेत.

तुम्हाला यात एक एक्सट्रीम ऑफ-रोड पॅकेजदेखील मिळेल जे 18 इंचांचे OD MT व्हील्स आणि 35-इंचाच्या टायर्ससह येते. यात अंडरबॉडी गार्ड्स आणि रॉक स्लाइडर आहेत. समोर आणि मागील भागात ई लॉकर दिले आहेत. अल्ट्रा व्हिजन 2 अंडर बॉडी कॅमेरा व्ह्यू आणि इतर विविध तंत्रज्ञानाने ही कार सुसज्ज आहे. या एसयूव्हीबद्दल फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु हे वाहन 830 एचपी आणि 15,591Nm टॉर्कसह येते, अशी माहिती समोर आली आहे.

3.5 सेकंदात 96 किमी स्पीड

हम्मर ईव्ही 3.5 सेकंदात 96 किमीचा वेग पकडू शकते. या ईव्हीची किंमत 58.70 लाख रुपये इतकी आहे. ही किंमत या कारच्या बेस मॉडेलची आहे. एडिशन 1 आणि एक्सट्रीम पॅकेजसाठी तुम्हाला 81.15 लाख रुपये मोजावे लागतील. असं म्हटलं जातंय की हमर ईव्ही टेस्ला सायबरट्रकला जोरदार टक्कर देईल. ही कार सिंगल चार्जमध्ये 563 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

सिंगल चार्जवर 480KM रेंज, Hyundai Ioniq 5 च्या बुकिंगसाठी ग्राहकांच्या रांगा

(GMC unveils 2024 Hummer EV, an electric off-road SUV with a range of 563 kms)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.