सणासुदीत दुचाकी खरेदीची सुवर्णसंधी; बाजारात दाखल होणार ही हटके मॉडेल्स
या यादीमध्ये बजाज, केटीएम, टीव्हीएस आणि अगदी बीएमडब्ल्यूचा समावेश केला आहे. गेल्या काही महिन्यांत नवीन बाईक लाँच न झाल्यामुळे तुम्ही जर आनंदी नसाल आणि तुम्हाला हवी असलेली बाईक सापडली नसेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही.
नवी दिल्ली : दसरा-दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता कोरोना महामारीचा प्रभावही कमी झाला आहे. मार्केटमध्ये पुन्हा हळूहळू आधीच उत्साह संचारत असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या सणासुदीच्या दिवसांत अनेक वाहन उत्पादक नवीन वाहने लाँच करण्यास तयार आहेत. देशात येत्या सणासुदीच्या काळात काही नवीन बाईक आणि स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध होतील, तर काही कंपन्या आपले नवीन मॉडेल लवकरच सादर करतील. आज आम्ही त्याच बाईक्स आणि स्कूटरची यादी येथे घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्ही नव्या बाईक्स किंवा स्कूटर खरेदीचा विचार करीत असाल तर ही यादी तुम्हाला उपयुक्त ठरेल. (Golden opportunity to buy a bike during the festival; These quirky models will be launched in the market)
आम्ही या यादीमध्ये बजाज, केटीएम, टीव्हीएस आणि अगदी बीएमडब्ल्यूचा समावेश केला आहे. गेल्या काही महिन्यांत नवीन बाईक लाँच न झाल्यामुळे तुम्ही जर आनंदी नसाल आणि तुम्हाला हवी असलेली बाईक सापडली नसेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमची आवडती बाईक या यादीतून निवडून येत्या सणासुदीच्या काळात ती घरी आणू शकता.
बजाज पल्सर 250
बजाज ऑटो या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन पल्सर 250 मोटरसायकल लाँच करणार असल्याची शक्यता आहे. भारतात लॉन्च होणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्प्लेसमेंट पल्सर असेल. यात 250 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन मिळण्याची अफवा आहे. भारतात मोटारसायकल चाचणीसाठी आधीच तयार केली गेली आहे.
नवीन जनरल KTM RC390
पल्सर बाईक्सच्या नवीन रेंज व्यतिरिक्त बजाज ऑटो भारतातील KTM RC श्रेणीच्या नव्या जनरेशनला हिरवा कंदील दाखवेल. याची सुरुवात RC390 पासून होईल. RC390 नोव्हेंबरमध्ये भारतात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.
टीव्हीएस ज्युपिटर 125
नवीन रेडर 125 नंतर टीव्हीएस मोटर कंपनी नव्या ज्युपिटर 125 दुचाकी विभागात 125 सीसी स्कूटरसह आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ही स्कुटर 7 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. ही हीरो मेस्ट्रो एज 125 आणि होंडा ऍक्टिव्हा 125 यासह भारतातील अन्य 125 सीसी स्कूटरचा थेट स्पर्धा करणार आहे.
BMW 400 GT
BMW Motorrad India ने याआधी अनेकदा नवीन 400 GT स्कूटरला टीज केले आहे. BMW च्या नवीन ऑफरसाठी प्री-लॉन्च बुकिंग भारतातील निवडक BMW Motorrad डीलरशिपवर देखील सुरू झाली आहे. इच्छुक ग्राहक 1 लाखांच्या टोकन रकमेसाठी ही स्कूटर बुक करू शकतात. ही आधीच काही आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. लॉन्च झाल्यावर या स्कूटरची किंमत सुमारे 4 लाख रुपये (एक्स-शोरूम) अपेक्षित आहे. (Golden opportunity to buy a bike during the festival; These quirky models will be launched in the market)
सामान्य माणसाला आणखी एक धक्का; ऑनलाईन खरेदी लवकरच महागणार#DTDC #Shiprocket #Delhivery #DotZot #Gati #DHL #FedEx #XpressBees https://t.co/CrlgjZGlcL
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
इतर बातम्या
मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘ऐ वतन तेरे लिए’ गाणं, व्हिडीओ व्हायरल
हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम, आता जुन्या दागिन्यांचे काय होणार?