पेट्रोल-डिझेलवरील खर्च टाळायचाय? अवघ्या 19,999 रुपयांत घरी न्या ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक

यूके आधारित इलेक्ट्रिक बाईक आणि लाईफस्टाइल ब्रँड गोझिरो मोबिलिटीने (GoZero Mobility) गुरुवारी भारतात स्केलिंग लाइट (Skellig Lite) ई-बाईक लाँच केली आहे.

पेट्रोल-डिझेलवरील खर्च टाळायचाय? अवघ्या 19,999 रुपयांत घरी न्या 'ही' इलेक्ट्रिक बाईक
Gozero Skellig Lite
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 9:59 PM

मुंबई : यूके आधारित इलेक्ट्रिक बाईक आणि लाईफस्टाइल ब्रँड गोझिरो मोबिलिटीने (GoZero Mobility) गुरुवारी भारतात स्केलिंग लाइट (Skellig Lite) ई-बाईक लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. नवीन मॉडेल प्रोडक्ट क्वालिटी आणि किंमत यामध्ये अचूक संतुलन ठेवत डिझाईन केलं आहे. शहरी भागात वापरण्यासाठी ही सायकल परफेक्ट आहे, असे कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. (GoZero launches Skellig Lite Electric bike at RS 19999 price)

ई-बाईक जास्तीत जास्त 25 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते. गोझीरोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार म्हणाले की, कोव्हिड – 19 साथीच्या आजारामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे पूर्वीपेक्षा अधिक गंभीरपणे पाहात आहे आणि ही ई-बाईक खासगी शहरी वाहतुकीइतकीच आरोग्यासाठी अनुकूल आहे, जी कोव्हिड संबंधित जोखमीपासून संरक्षण प्रदान करते

बाईकमध्ये रिप्लेसेबल 210 Wh लिथियम बॅटरी पॅक आणि एक 250 W रियर हब-ड्राइव्ह मोटर देण्यात आली आहे. ही बाईक GoZero Drive Control 2.0 LED डिस्प्ले युनिटद्वारे कंट्रोल करता येते. GoZero Mobility ने म्हटले आहे की, या ई-बाइकमध्ये रायडरला तीन पेडल-असिस्ट मोडमध्ये निवड करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

2.5 तासात पूर्ण चार्ज होणार

निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, या ई-बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास 2.5 तास लागतात. साथीच्या रोगाच्या काळात प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन असणे आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत ही ई-बाईक खासगी शहरी वाहतुकीसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. तसेच फिटनेससाठीदेखील चांगली आहे.

नव्या सब्सिडीमुळे ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 14,500 रुपयांनी स्वस्त

अलीकडेच अवजड उद्योग विभागाने (Department of heavy industries) हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये (FAME II) उपलब्ध असलेल्या अनुदानासंदर्भात (सब्सिडी) काही महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या आहेत. यासंदर्भात, विभागाने एक अधिसूचना देखील जारी केली आहे, त्याअंतर्गत देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनुदानाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना दिले जाणारे अनुदान आता 10 हजार रुपये प्रति kWh च्या ऐवजी 15 हजार रुपये प्रति KWh इतकं असेल. या उपक्रमाचा थेट परिणाम अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीवरही दिसून आला आहे. कंपनीने या स्कूटरची किंमत कमी केली असून एक्स्प्रेस ड्राइव्हमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार FAME II योजनेतील दुरुस्तीनंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 14,500 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

दिल्लीत या स्कूटरची किंमत 1,46,926 रुपये इतकी आहे, ज्यात आधीच्या अनुदानासह अ‍ॅथर डॉट / पोर्टेबल चार्जर देखील आहे. आता या नव्या अनुदानानंतर दिल्लीत या स्कूटरची किंमत 1,32,426 रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, बँगलोरमधील या स्कूटरची किंमत आधीच्या 1,59,000 रुपयांवरून 1,44,500 रुपयांपर्यंत कमी होईल.

इतर बातम्या

‘या’ तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर; आजपासून बुकिंग सुरु

सर्व इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकेल ही सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फिचर्सबद्दल

ब्लॅक, पिंक, लाइट ब्लूसह अनेक रंगांमध्ये Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, 499 रुपयांत बुकिंग करा

(GoZero launches Skellig Lite Electric bike at RS 19999 price)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.