Harley Davidson ची Royal Enfield सोबत टक्कर? Hero चा ‘हा’ प्लॅन वाचा

हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडन यांनी आपली भागीदारी वाढवली आहे. मात्र, या भागीदारीत कंत्राटी तत्त्वावर वाहने बनविणे आणि नवीन मोटारसायकल तयार करण्याची योजना यांचा समावेश आहे. हार्ले डेव्हिडसन एक्स-440 चे उत्पादन वाढल्याने रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढू शकतात.

Harley Davidson ची Royal Enfield सोबत टक्कर? Hero चा ‘हा’ प्लॅन वाचा
Harley DavidsonImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 12:51 PM

तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास बाईकविषयी माहिती देणार आहोत. आता रॉयल एन्फिल्डल हार्ले-डेव्हिडन टक्कर देणार असल्याचं बोललं जातंय. कारण, हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडन यांनी आपली भागीदारी वाढवली आहे.

दोन्ही कंपन्यांनी आपली भागीदारी वाढवली

तुम्हालाही हार्ले डेव्हिडसन बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडन यांनी आपली भागीदारी वाढवली आहे. हार्ले डेव्हिडसन एक्स-440 बाईक अधिकाधिक बनवून बाजारात विकता यावी यासाठी आता दोन्ही कंपन्यांनी आपली भागीदारी वाढवली आहे. हार्ले डेव्हिडसन एक्स-440 चे उत्पादन वाढल्याने रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढू शकतात.

दोन्ही कंपन्यांची भागीदारी कोणत्या बाजारपेठांना लागू होईल? याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, या भागीदारीत कंत्राटी तत्त्वावर वाहने बनविणे आणि नवीन मोटारसायकल तयार करण्याची योजना यांचा समावेश आहे.

मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडसन

2020 मध्ये अमेरिकेची बाइक कंपनी हार्ले-डेव्हिडसनने हिरो मोटोकॉर्पसोबत परवाना करार केला होता, ज्याद्वारे हिरोला हार्लेच्या एक्स-400 मॉडेल्सच्या विक्रीचा अधिकार मिळाला होता. तेव्हापासून हिरोकडे हार्लेला मोटारसायकल, तसेच ब्रँड-एक्सक्लुझिव्ह हार्ले-डेव्हिडसन डीलरशिप नेटवर्क आणि हिरो मोटोकॉर्पच्या भारतातील विद्यमान डीलरशिप नेटवर्कद्वारे पार्ट्स आणि अॅक्सेसरीज आणि जनरल मर्चेंडाइज, रायडिंग गिअर आणि ड्रेसेसविकण्याचे आणि सर्व्हिस करण्याचे अधिकार आहेत.

अमेरिकेतील विक्रमच मोडले

भारतात हार्ले-डेव्हिडसनची विक्री 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. कंपनीची स्थापना 1903 मध्ये झाली. तेव्हापासून त्याच्या विक्रीने केवळ अमेरिकेतील विक्रमच मोडले नाहीत. खरं तर हार्लेच्या गाड्यांना उर्वरित जगात मोठी मागणी होती. पण 2019 मध्ये त्याची विक्री कमी झाली, त्यामागचे कारण त्याचे उच्च आयात शुल्क असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कंपनीने हिरो मोटोकॉर्पसोबत भागीदारी केली.

रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढू शकतात

हार्ले डेव्हिडसन एक्स-440 बाईक अधिकाधिक बनवून बाजारात विकता यावी यासाठी आता दोन्ही कंपन्यांनी आपली भागीदारी वाढवली आहे. हार्ले डेव्हिडसन एक्स-440 चे उत्पादन वाढल्याने रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढू शकतात. 2020 मध्ये अमेरिकेची बाइक कंपनी हार्ले-डेव्हिडसनने हिरो मोटोकॉर्पसोबत परवाना करार केला होता, ज्याद्वारे हिरोला हार्लेच्या एक्स-400 मॉडेल्सच्या विक्रीचा अधिकार मिळाला होता.

आता हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडन यांनी आपली भागीदारी वाढवली आहे. पण, यात रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढू शकतात, असं बोललं जातंय.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.