Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bajaj Pulsar N250 Black : नवीन बजाज पल्सरचा फर्स्ट लूक पाहिलात का? नवी गाडी लवकरच बाजारात…

नवीन बाईक सध्याच्या बजाज पल्सर प्रमाणेच ऑइल कूल्ड 249.07cc इंजिनव्दारे चालविली जाऊ शकते. हे सध्या 24.5 PS कमाल पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मात्र, त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते. बजाज पल्सर हे बजाज ऑटोचे सर्वात लोकप्रिय बाइक मॉडेल आहे.

Bajaj Pulsar N250 Black : नवीन बजाज पल्सरचा फर्स्ट लूक पाहिलात का?  नवी गाडी लवकरच बाजारात...
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:48 PM

मुंबई : ब्लॅक एडिशनसह येत असलेल्या या नवीन बजाज पल्सरचे सर्व एलिमेंट ब्लॅक असतील. कंपनी आपल्या इंजिन कव्हरपासून ते एक्झॉस्ट सिस्टम आणि व्हील्सपर्यंत सर्व काही काळ्या रंगात रंगवून बाजारात आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवीन बजाज पल्सरचा फर्स्ट लुक समोर आला असून स्पोर्ट्स बाइकच्या शौकीनांमध्ये नवीन बजाज पल्सरला घेउन उत्सूकता बघायला मिळत आहे. ही बाइक कधी लाँच होणार याबाबतची प्रतीक्षा लागून आहे. नवीन बजाज पल्सरची पहिली झलक कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दिसली आहे. ही पल्सर एन250 (Pulsar N250) ची ब्लॅक एडिशन आहे. कंपनी त्यांच्या नवीन बाइकचे नाव बजाज प्लसर एन250 ब्लॅक (Bajaj Pulsar N250 Black) ठेवणार की फक्त ब्लॅक एडिशन (Black Edition) ठेवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अद्याप पूर्ण माहिती नाही

नवीन बजाज पल्सरच्या सोशल मीडिया पोस्टशिवाय, कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही. ही नवीन पल्सर केव्हा लाँच होईल हेदेखील स्पष्ट झालेले नाही, परंतु जेव्हा जेव्हा एखादी कंपनी तिच्या मॉडेलचे मार्केटिंग सुरू करते, तेव्हा त्याचा अर्थ असा, की ते प्रोडक्ट लवकरच लाँच होणार आहे. नवीन बजाज पल्सर N250 ची ब्लॅक एडिशन त्याच्या सध्याच्या मॉडेलवर आधारित असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे मॉडेल पुढील महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन पल्सरमध्ये खास काय ?

ब्लॅक एडिशनमुळे या बाईकचे सर्व एलिमेंट काळे असणार आहेत. कंपनी आपल्या इंजिन कव्हरपासून ते एक्झॉस्ट सिस्टम आणि व्हील्सपर्यंत सर्व काही काळ्या रंगात रंगवून बाजारात दाखल करणार आहे. बाईक सध्याच्या बजाज पल्सर प्रमाणेच ऑइल-कूल्ड 249.07cc इंजिनद्वारे चालविली जाऊ शकते. हे सध्या 24.5 PS कमाल पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मात्र, त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते. बजाज पल्सर हे बजाज ऑटोचे सर्वात लोकप्रिय बाइक मॉडेल आहे. कंपनीने पहिल्यांदा 2000 मध्ये लाँच केले होते. त्यामुळे स्कूटर बनवणारी बजाज ऑटो कंपनी ही मोटारसायकल कंपनी बनली. सध्या ही बाईक 125cc ते 250cc इंजिन सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.