कडाक्याच्या थंडीत उपयोगी येतील हे हिटर हॅन्डग्लोव्हज, बाइक चालवताना हात पडणार नाही सुन्न
जर तुम्ही हिवाळ्यात बाईक चालवत असाल तर हात सुन्न होण्यापासून रोखण्यासाठी हे मजबूत हॅन्ड ग्लोव्हज एक उत्तम उपाय ठरू शकतात.
आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. हिवाळ्यात ऑफिस ते घर आणि घरातून ऑफिसला बाईकवरून जात असाल तर थंडीच्या दिवसात हात उबदार ठेवण्यासाठी हीटरने सुसज्ज असलेले हे हॅन्ड ग्लोव्हज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हिटर असलेले हे हॅन्डग्लोव्हज खास थंड हवामानात बाईक चालवणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. तुम्ही देखील थंडीच्या दिवसात ऑफिस ते घर असा रोजचा प्रवास होत असेल आणि गाडी चालवताना हात सुन्न पडत असतील तर हिटर असलेल्या या हॅन्ड ग्लोव्हजचा तुम्ही वापर करू शकता, त्यांच्यात काही दमदार फीचर्स आहेत ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
ग्लोव्हजची वैशिष्ट्ये:
इन-बिल्ट हीटर: ग्लोव्हजमध्ये लहान हीटिंग एलिमेंट्स असतात जे बॅटरीपासून चालतात. यामुळे हात लवकर आणि योग्य प्रमाणात गरम होतात.
बॅटरी ऑपरेटेड: हे हातमोजे रिचार्जेबल बॅटरीसह येतात, जे एकदा चार्ज केल्यावर 5-8 तास तुमच्या हाताला उष्णता प्रदान करू शकतात.
तापमान नियंत्रण: तापमान नियंत्रित करण्यासाठी बऱ्याच मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या सेटिंग्ज असतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार हिट ऍडजस्ट करू शकता.
वॉटरप्रूफ आणि विंडप्रूफ : थंड वारे आणि बर्फवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी हे हातमोजे वॉटरप्रूफ आणि विंडप्रूफ मटेरियलपासून बनवलेले आहेत.
टच स्क्रीन सपोर्ट : या ग्लोव्हजमध्ये टच स्क्रीन कंपॅटिबिलिटी आहे, त्यामुळे हातमोजे न काढता तुम्ही तुमचा फोन वापरू शकता.
फायदे:
लांबच्या प्रवासात थंडीपासून हातांचे रक्षण होते.
गाडी चालवताना चांगली पकड आणि हाताना आराम मिळतो.
हिवाळ्यात सुन्न झालेल्या हातांमुळे अपघात होण्याची शक्यता कमी असते.
किंमत आणि उपलब्धता:
ब्रँड आणि फीचर्सनुसार या ग्लोव्हजची किंमत 1,500 ते 5,000 रुपयांपर्यंत असू शकते. तुम्ही हे ग्लोव्हज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून किंवा स्थानिक बाइक ॲक्सेसरीज स्टोअर मधून खरेदी करू शकता. बाइक चालवताना थंडीने त्रस्त असाल तर हे हिटर असलेले हॅन्डग्लोव्हज तुमच्यासाठी स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरू शकतात. आता थंडीच्या दिवसात तुम्ही सुद्धा हिटर असलेले हॅन्डग्लोव्हज घातल्यास हात सुन्न पडणार नाही आणि आरामात गाडी चालवू शकाल.