देशभरातील कारप्रेमी वाट पाहात असलेली एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार

जीप कंपनी जीप कंपास फेसलिफ्ट (Jeep Compass facelift) ही एसयूव्ही 7 जानेवारी 2021 मध्ये लाँच करणार आहे.

देशभरातील कारप्रेमी वाट पाहात असलेली एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 7:03 PM

मुंबई : जीप कंपनी (Jeep) जीप कंपास फेसलिफ्ट (Jeep Compass facelift) ही एसयूव्ही 7 जानेवारी 2021 मध्ये लाँच करणार आहे. कंपास फेसलिफ्टच्या इंटरनॅशनल डेब्यूनंतर अवघ्या काहीच दिवसात ही शानदार कार लाँच केली जात आहे. या गाडीच्या डिझाईनने अनेकांना भुरळ घातली आहे. डिझाईनसह शानदार इंटिरियर आणि एक्सटिरियरमुळे अनेकजण या कारच्या लाँचिंगची वाट पाहात आहेत. (Heavily Updated Jeep Compass to be unveiled on 7 January 2021)

स्टाईलिंगच्या बाबतीत जीप कंपासमध्ये रिवाइज्ड हेडलाईट्स देण्यात येतील, जे इंटीग्रेटेड LED DRLs आहेत. सोबतच या कारमध्ये तुम्हाला 7 स्लेट ग्रील मिळतील जे हनीकॉम्बसारख्या इंसर्ट्ससह येतात. या कारमध्ये तुम्हाला नवीन फ्रंट बंपर मिळेल जो स्किड प्लेटस येतो. या SUV मध्ये तुम्हाला नवीन एलॉय व्हिल्स दिले जाणार आहेत.

इंटिरियरबाबत बोलायचे झाल्यास या कारमध्ये तुम्हाला रिस्टाइल्स डॅशबोर्ड मिळेल जो 10.1 इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह असेल. यामध्ये तुम्हाला नवीन एसी वेंट आणि HVAC कंट्रोलही मिळेल. नवीन टचस्क्रीन FCA यूकनेक्ट 5 इन्फोटेनमेंट सिस्टिमसह मिळेल. यामध्ये तुम्हाला अमेझॉन अॅलेक्सा सपोर्ट, एपल कार प्लेदेखली मिळेल.

कंपास फेसलिफ्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये नवीन इंजिनासह येणार आहे. या गाडीत तुम्हाला 2.0 लीटर डीझेल इंजिन मिळेल जे 173hp आणि 350nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये तुम्हाला 1.4 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 163 hp आणि 250nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅनुअल स्टँडर्डसह येतात. पेट्रोलमध्ये ग्राहकांना 7 स्पीड डुअल क्लच ऑटोमॅटिक ऑप्शन देण्यात आला आहे. तर डिझेलमध्ये नाइन स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटो ऑप्शन दिला आहे.

जीप कंपास फेसलिफ्ट ह्युंदाय टकसन आणि स्कोडा Karoq या दोन गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये टक्कर देणार आहे. फेसलिफ्टमध्ये तुम्हाला ट्रेलहॉक वेरिएंटही देण्यात आलं आहे. जीप नवीन 7 सीटर SUV लाँच करण्याची तयारी करत आहे, जी थेट टाटा फॉर्च्युनर आणि फोर्ड Endeavour ला टक्कर देईल.

हेही वाचा

SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यास मारुती सुझुकी सज्ज, कंपनी पाच कार लाँच करण्याच्या तयारीत

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट

(Heavily Updated Jeep Compass to be unveiled on 7 January 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.